Badrinath Temple : अयोध्येनंतर आता बद्रीनाथ मंदिरातील देणगीवर डल्ला; कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल
बद्रिनाथ मंदिरात देणग्यांमध्ये कथित अनियमितताप्रकरणी श्री बद्रिनाथ-केदारनाथ मंदिर समितीच्या एका निलंबित कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी बुधवारी दिली.

Badrinath Temple – बद्रिनाथ मंदिरात देणग्यांमध्ये कथित अनियमितताप्रकरणी श्री बद्रिनाथ-केदारनाथ मंदिर समितीच्या एका निलंबित कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी बुधवारी दिली.
श्री बद्रिनाथ-केदारनाथ मंदिर समितीच्या अध्यक्षांचे खासगी सचिव म्हणून कार्यरत असलेल्या प्रमोद नौटियाल यांच्याविरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आला.
देणगी व्यवस्थापनातील अनियमिततेचे आरोप प्राथमिकदृष्ट्या खरे असल्याचे चार सदस्यांच्या चौकशी समितीला आढळल्यानंतर नौटियाल यांना निलंबित करण्यात आले होते.
त्यानंतर काही तासांतच ही कारवाई करण्यात आली. बद्रिनाथ पोलीस ठाण्यात कलम ३०६ आणि कलम ३१६(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणाच्या चौकशीसाठी उत्तराखंड सरकारनेही तीन सदस्यीय समिती स्थापन केली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी गढवाल विभागाचे आयुक्त यांची नियुक्ती करण्यात आली असून ही समिती १५ दिवसांत आपले निष्कर्ष व शिफारसी राज्य सरकारला सादर करेल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.






