Badlapur School Girl Case : ‘विरोधक त्याची बाजु घेत असतील तर ते निंदणीय..’; अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणी CM शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

Eknath Shinde । Badlapur School Girl Case । Akshay Shinde : बदलापूर येथील शाळेत दोन चिमुरड्यांवर लैंगिक अत्याचार करणारा नराधम अक्षय शिंदे याने आत्महत्येचा प्रयत्न केला असल्याचं बोललं गेलं होत. मात्र, अक्षय शिंदेची आत्महत्या नाही तर एन्काऊंटर झाल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, अक्षय शिंदेला तळोजा जेलमधून बदलापूर क्राईम ब्रान्चला घेऊन जात होते, त्यावेळी हा प्रकार घडला. या झटापटीत एपीआय निलेश मोरे यांना लागली गोळी लागली आहे. साधारण 6.30 च्या आसपास पोलीसांची टीम मुंब्रा बायपास जवळ आली.
तेव्हा आरोपीने एका कॉन्स्टेबलच्या हातातून बंदूक हिसकावून गोळीबार केला. पोलिसांवर गोळीबार केल्यानंतर झालेल्या झटापटीत एपीआय निलेश मोरे यांनी स्वसंरक्षणासाठी गोळी झाडली. यामध्ये अक्षय गंभीर जखमी झाला. अक्षयच्या चेहऱ्यावर गोळ्या लागल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, घडलेल्या संपूर्ण प्रकरणावर आता महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “बदलापूर प्रकरणातील आरोपीवर पहिल्या पत्नीने लैंगिक अत्याचारचा गुन्हा दाखल केला होता. त्या प्रकरणात पोलीस त्याला तळोजा कारागृहातून घेऊन येत असताना ही घटना घडली आहे. या दरम्यान त्याने पोलिसांवर गोळी झाडली.
यानंतर पोलिसांनी स्वरक्षणासाठी त्याच्यावर गोळी झाडली. पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहे. एपीआय मोरे यांच्यावर आरोपीने फायरिंग केली. पोलिसांनी बचावासाठी त्याच्यावर गोळी झाडल्याची प्राथमिक माहिती आली आहे. ज्याने या लहान मुलींवर अन्याय केला. आधी विरोधक म्हणत होते की त्याला फाशी द्या. आता विरोधक त्याची बाजु घेत असतील तर ते निंदणीय आहे. असं एकनाथ शिंदे म्हणाले.
एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, “विरोधी पक्षाला विरोधात बोलायचा काहीही अधिकार आहे. पोलीस जखमी आहे एपीआय दर्जाचा त्याच्याबाबत विरोधकांना काहीही वाटत नाही का. जे पोलीस कायदा सुव्यस्था राखण्यासाठी काम करतात. उन्हात पावसात थंडी वाऱ्यात काम करतात. त्या पोलिसांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणं अशा वेळी विरोधकांनी असं वक्तव्य करणं दुर्दैवी आहे. या प्रकरणात चौकशी होईल आणि सत्य समोर येईल. विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. बहीण योजनेनेने ते बिथरले आहेत. त्यामुळे ते उलटसुलट आरोप करत आहेत.’
आरोपी अक्षय शिंदेकडे काय जबाबदारी होती?
या प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे हा संबंधित शाळेत सफाई कामगार होता. त्याचे वय २४ वर्षे आहे. त्याची नेमणूक ही सफाईसाठी नेमलेल्या कंपनीकडून केलेली होती. विशेष म्हणजे त्याला लहान मुलींना वॉशरूमला घेऊ जाण्याची जबाबदारी देण्यात आली.
लैंगिक अत्याचाराचा प्रकार कधी समोर आला?
बदलापूर पूर्वेतील आदर्श विद्यालय या शाळेमध्ये एका चार वर्षांच्या आणि एका सहा वर्षांच्या मुलीवर शाळेतील शिपायाकडून अत्याचार करण्यात आला. लघुशंकेला घेऊन जाऊन या मुलींवर अत्याचार करण्यात आला. १२ ऑगस्ट रोजी एका मुलीसोबत दुष्कृत्य केले गेले, तर १३ ऑगस्टला आणखी एका दुसऱ्या चिमुरडीवर अत्याचार करण्यात आला.
या मुली शाळेत जायला तयार नसल्याने त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली, त्यानंतर हा गंभीर प्रकार उघडकीस आला.दोन्ही पीडित मुलींच्या कुटुंबीयांनी १६ ऑगस्ट रोजी पोलिस ठाण्यात धाव घेतली. मात्र गुन्हा दाखल करण्यास पोलिसांनी १२ तासांचा विलंब केल्याचा आरोप कुटुंबीयांकडून करण्यात आला आहे. या प्रकरणी अक्षय शिंदे नावाच्या आरोपीला अटक करण्यात आली आहे.





