पुणे | मेट्रोच्या कामांमुळे रस्त्यांची दुरवस्था

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – माण- हिंजवडी शिवाजीनगर या परिसरातील रस्त्याची दुरवस्था झाल्याने वाहनधारकांसह नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
याची दखल घेत पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) मेट्रो रेल लिमिटेड कंपनीला (पीआयटीसीएमआरएलला) नोटीस बजावली आहे. यात संबंधितांना पंधरा दिवसांत कामे पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
संबंधित कंपनीकडे माण- हिंजवडी ते शिवाजीनगर या भागांतील रस्त्याची “बांधा वापरा हस्तांतरीत करा’ या तत्वावर जबाबदारी आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून संबंधित भागातील रस्त्याची दुरवस्था झाल्याने नागरिकांसह वाहनधारक त्रस्त आहेत.
त्यामुळे संबंधित रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्यासंदर्भात “पीएमआरडीए’चे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी संबंधित सवलतकार सवलतकार पुणे आयटीसीटी मेट्रो रेल लिमिटेड यांना नोटीस बजावली.
यात आगामी पंधरा दिवसात अपेक्षितरित्या रस्ता दुरुस्त करण्याचा अल्टिमेटम देण्यात आला आहे. संबंधित कालावधीत तर काम पूर्ण झाले नाही तर मेट्रोचे सेक्शन १ मधील काम थांबवण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.





