Babar Azam : हातात संत्री अन् डोळ्यात माणुसकी! बाबर आझमच्या व्हायरल फोटोमागचं खरं कारण काय? जाणून घ्या
Babar Azam : बाबर आझमचा एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो लोकांना फळे वाटताना दिसत आहे

Babar Azam distributing fruits photo viral : पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार बाबर आझम सध्या कारकीर्दीच्या वाईट टप्प्यातून जात आहे. त्याला बांगलादेश दौऱ्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या पाकिस्तानच्या वनडे संघातून डच्चू देण्यात आला आहे. अशात बाबर आझमचा एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो लोकांना फळे वाटताना दिसत आहे. या फोटो मागील सत्य काय आहे? जाणून घेऊया.
नेकीचे काम: रमजाननिमित्त मदतीचा हात –
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला फोटो हा बाबर आझमचाच आहे. ज्यामध्ये तो गरजू लोकांना संत्री आणि इतर फळे वाटताना दिसत आहे. बाबर आझम एका फाउंडेशनच्या माध्यमातून गरजू लोकांची मदत करत आहे. पवित्र रमजान महिन्याचे औचित्य साधून त्याने फळांची पाकिटे तयार केली आणि स्वतः रस्त्यावर उतरून ती गरजूंपर्यंत पोहोचवली.
Great gesture by Babar Azam!
He’s Providing the fruits to the needy in the holy month of Ramzan.
MashaALLAH! pic.twitter.com/bOKhtWJtLP— Maham Fatima (@Minaa_0fficial) March 9, 2026
हा फोटो पाहून चाहते त्याच्या या कृतीचे कौतुक करत असले, तरी क्रिकेटच्या मैदानात मात्र त्याच्यासाठी वेळ कठीण दिसत आहे. सोशल मीडियावर त्याच्या या माणुसकीच्या दर्शनामुळे त्याचे प्रचंड कौतुक होत असून, त्याच्या या नेक कामाची सर्वत्र चर्चा आहे.
मैदानात मात्र ‘बॅड पॅच’: बांगलादेश दौऱ्यातून बाहेर
एकीकडे सामाजिक कामात कौतुक होत असले तरी, बाबरला पाकिस्तानच्या राष्ट्रीय संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. आगामी बांगलादेश दौऱ्यासाठी पाकिस्तानचा वनडे संघ जाहीर झाला असून, त्यात बाबर आझमचे नाव नाही. ११ मार्चपासून सुरू होणाऱ्या ३ एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत तो दिसणार नाही.
टी-२० विश्वचषकातील फ्लॉप शो ठरला कारणीभूत –
टी-२० विश्वचषक २०२६ मधील बाबरची अत्यंत खराब कामगिरी त्याला संघातून वगळण्यामागे मुख्य कारण ठरली आहे. या विश्वचषकात बाबरने ६ सामन्यांतील ४ डावांत केवळ ९१ धावा केल्या. यादरम्यान त्याची सरासरी २२.७५ आणि स्ट्राईक रेट ११३ पेक्षाही कमी होता. या खराब कामगिरीचा फटका त्याला आगामी दौऱ्यातील स्थान गमावून सोसावा लागला आहे.





