ICC Rule Changes : आयसीसीचा मास्टरप्लॅन! चालू सामन्यात बदलणार चेंडूचा रंग; क्रिकेटचे ‘हे’ ४ मोठे नियम बदलणार
ICC Rule Changes : आयसीसी लवकरच क्रिकेटच्या नियमांमध्ये काही मोठे बदल करू शकते. यामध्ये केवळ लाल चेंडूच्या क्रिकेटचाच नव्हे, तर पांढऱ्या चेंडूच्या आणि गुलाबी चेंडूच्या क्रिकेटचाही समावेश असेल.

ICC Cricket Rule Changes 2026 : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) लवकरच क्रिकेटच्या नियमांमध्ये अत्यंत क्रांतिकारी आणि मोठे बदल करण्याच्या तयारीत आहे. यामध्ये केवळ लाल चेंडूचे (Red Ball) क्रिकेटच नाही, तर पांढऱ्या आणि गुलाबी चेंडूच्या क्रिकेटचाही समावेश आहे. सर्वात आश्चर्यकारक बाब म्हणजे, आता खराब हवामान किंवा अंधारामुळे खेळ थांबल्यास चालू सामन्यातच रेड बॉलऐवजी पिंक बॉलचा (Pink Ball) वापर केला जाऊ शकतो.
आयसीसीच्या ‘प्लेइंग कंडिशन्स’मध्ये सुधारणा करण्यासाठी सध्या या प्रस्तावांवर विचारविनिमय सुरू आहे. ३० मे रोजी अहमदाबाद येथे होणाऱ्या आयसीसीच्या महत्त्वपूर्ण बोर्ड बैठकीत या नियमांना मंजुरी मिळू शकते. हे नवीन नियम १ ऑक्टोबर २०२६ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये लागू केले जाण्याची शक्यता आहे.
१. चालत्या टेस्ट मॅचमध्ये बदलणार बॉल!
क्रिकबझच्या अहवालानुसार, सर्वात मोठा बदल कसोटी क्रिकेटमध्ये होऊ शकतो. जर पावसामुळे किंवा खराब प्रकाशामुळे (Bad Light) सामना विस्कळीत होत असेल, तर दोन्ही संघांच्या संमतीने चालू सामन्यातच थेट रेड बॉलवरून पिंक बॉलवर खेळ स्विच केला जाऊ शकतो. जेणेकरून फ्लडलाईट्समध्ये खेळ पुढे सुरू ठेवता येईल.
🚨 Crackdown on illegal bowling actions
The ICC is considering a major change that could reshape how suspect bowling actions are monitored in cricket.
• On-field umpires may soon get access to HawkEye data during matches
• The technology could help officials identify illegal… pic.twitter.com/emqUXPghsQ— MK Sharma ✍️ (@EmediaManoj) May 23, 2026
२. वनडेमध्ये ड्रिंक्स ब्रेकदरम्यान हेड कोच मैदानात उतरणार!
दुसरा मोठा प्रस्तावित बदल एकदिवसीय (ODI) क्रिकेटशी संबंधित आहे. आतापर्यंत वनडेच्या ड्रिंक्स ब्रेकदरम्यान फक्त राखीव (सब्स्टिट्युट) खेळाडूंनाच मैदानात पाणी घेऊन जाण्याची परवानगी असते. मात्र, नव्या नियमांनुसार आता संघाच्या मुख्य प्रशिक्षकांना (Head Coach) ड्रिंक्स ब्रेकवेळी थेट मैदानावर जाऊन खेळाडूंशी रणनीती आखण्याची परवानगी मिळू शकते. टी-२० क्रिकेटमध्ये अशी रणनीतिक चर्चा (Tactical Consultation) करण्यास आधीच परवानगी आहे.
३. टी-२० मधील इनिंग ब्रेक ५ मिनिटांनी कमी होणार!
टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमधील डावांच्या (Innings) मधील अंतर आता कमी होणार आहे. सध्याच्या नियमांनुसार दोन्ही डावांच्या मध्ये २० मिनिटांचा ब्रेक असतो, जो आता ५ मिनिटांनी घटवून १५ मिनिटांचा केला जाऊ शकतो. यामुळे सामन्याचा वेळ वाचवण्यास मदत होईल.
४. हॉकआय (Hawk-Eye) टेक्नॉलॉजीने तपासणार बॉलिंग अॅक्शन!
गोलंदाजांच्या बेकायदेशीर गोलंदाजीवर (Chucking) लगाम लावण्यासाठी आयसीसी तंत्रज्ञानाचा मोठा वापर करणार आहे. आता मैदानावरील अंपायर्स ‘हॉकआय’ तंत्रज्ञानाच्या मदतीने गोलंदाजाची अॅक्शन वैध (Legal) आहे की नाही, हे थेट मैदानावरच तपासू शकतील.



