Babar Azam : BBL मध्ये पाकिस्तानी स्टार्सचा वारंवार अपमान? शाहीन-रिझवाननंतर आता भरमैदानात बाबरची नाचक्की!

Babar Azam Embarrass in BBL 2026 : ऑस्ट्रेलियातील ‘बिग बॅश लीग’मध्ये (BBL) खेळणाऱ्या पाकिस्तानी खेळाडूंसाठी हा हंगाम अत्यंत कठीण आणि अपमानास्पद ठरत असल्याचे चित्र दिसत आहे. सिडनी सिक्सर्स आणि सिडनी थंडर्स यांच्यातील सामन्यात एक अशी घटना घडली, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथने चक्क बाबर आझमला सिंगल धाव घेण्यास नकार दिला. यामुळे बाबर आझमचा चेहरा बघण्यासारखा झाला होता आणि त्याचे चाहते सोशल मीडियावर संताप व्यक्त करत आहेत.
नेमकं घडलं काय?
सिडनी सिक्सर्स १९० धावांच्या मोठ्या लक्षाचा पाठलाग करत असताना ११ व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर बाबर आझमने फटका मारून धाव घेण्याचा प्रयत्न केला. बाबरला स्ट्राइक बदलायची होती, पण नॉन-स्ट्रायकिंग एंडला असलेल्या स्टीव्ह स्मिथने त्याला चक्क ‘नाही’ म्हटले आणि धाव घेण्यास नकार दिला.
या मागे होते तांत्रिक कारण –
“They’ve said no run to that.”
Steve Smith knocked a run back off the bat of Babar Azam, so he could have the strike for the Power Surge! #BBL15 pic.twitter.com/BaZET2UF2t
— KFC Big Bash League (@BBL) January 16, 2026
बीबीएलमधील ‘पॉवर सर्ज’ (Power Surge) नियमाचा फायदा घेण्यासाठी स्मिथने ही खेळी केली होती. ११ व्या षटकानंतर फलंदाजी करणाऱ्या संघाला २ षटकांचा अतिरिक्त पॉवरप्ले घेता येतो. स्मिथला माहीत होते की तो सध्या फॉर्मात आहे, म्हणून त्याला पुढच्या ओव्हरमध्ये स्वतःकडे स्ट्राईक हवी होती. स्मिथचा हा निर्णय योग्य ठरला कारण त्याने पुढच्या ओव्हरमध्ये ३२ धावा कुटल्या, पण बाबर आझमच्या चेहऱ्यावर मात्र नाराजी स्पष्ट दिसत होती.
पाकिस्तानी खेळाडूंची ऑस्ट्रेलियात ससेहोलपट?
या हंगामात केवळ बाबरच नाही, तर पाकिस्तानच्या इतर दिग्गजांनाही ‘धक्के’ बसले आहेत:
- मोहम्मद रिझवान: संथ फलंदाजी केल्यामुळे रिझवानला मेलबर्न रेनेगेड्सने मध्येच ‘रिटायर्ड आऊट’ करून मैदानाबाहेर बोलावले होते, ज्यामुळे त्याची मोठी नाचक्की झाली.
- शाहीन शाह आफ्रिदी: शाहीनला एका सामन्यात दोन ‘हाय फुल टॉस’ चेंडू टाकल्यामुळे पंचांनी षटक पूर्ण होण्याआधीच (२.४ ओव्हरनंतर) गोलंदाजी करण्यापासून रोखले. शाहीनने त्या सामन्यात ४३ धावा दिल्या होत्या.
- बाबर आझम: आता भरमैदानात स्मिथने सिंगल नाकारल्याने बाबरची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
एका बाजूला ऑस्ट्रेलियन खेळाडू आक्रमक खेळ करत असताना दुसरीकडे पाकिस्तानचे स्टार खेळाडू मात्र संघर्ष करताना आणि अपमानास्पद प्रसंगांना सामोरे जाताना दिसत आहेत.





