B Sudarshan Reddy : उपराष्ट्रपती निवडणुक पराभवानंतर बी सुदर्शन रेड्डी यांची पहिली प्रतिक्रिया

Vice President election results 2025 : राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) उमेदवार सीपी राधाकृष्णन यांनी उपराष्ट्रपति निवडणुकीत विजय मिळवला असून, ते देशाचे 15 वे उपराष्ट्रपति बनले आहेत. मंगळवारी झालेल्या निवडणुकीत निवडणूक अधिकारी आणि राज्यसभेचे महासचिव पीसी मोदी यांनी राधाकृष्णन यांना विजेता घोषित केले. या निवडणुकीत एनडीएला 452 मते मिळाली, तर विरोधी पक्षाचे उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी यांना 300 मतांवर समाधान मानावे लागले.
दरम्यान, पराभवानंतर बी सुदर्शन रेड्डी यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचा निकाल माझ्या बाजूनं आला नसला तरी स्वीकारला असून महत्त्वाच्या उद्देशासाठी संघर्ष सुरुच राहील, असं त्यांनी म्हटले.
नेमकं काय म्हणाले बी. सुदर्शन रेड्डी?
आज खासदारांनी उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी त्यांचा मताधिकार नोंदवला. निवडणुकीचा जो निकाल लागला आहे तो विनम्रपणे आणि महान गणराज्याच्या लोकशाही व्यवस्थेवर विश्वास ठेवत स्वीकारत आहे. संविधानिक नितिमत्ता, न्याय आणि प्रत्येक व्यक्तीचा सन्मान या मुल्यांनी माझ्या जीवनात मार्ग दाखवला, त्याच्यावर मी चाललो, त्या मूल्यांसाठी लढण्याची संधी मिला मिळाली. जरी निकाल माझ्या बाजूनं आलेला नसला तरी मोठ्या उद्देशासाठी सामुदायिकपणे लढत राहू. वैचारिक संघर्ष ताकदीनं सुरच राहील.
STORY | Ideological battle continues with ever greater vigour: Reddy after VP poll defeat
Opposition’s vice presidential candidate B Sudershan Reddy Tuesday said he humbly accepts the defeat in the vice presidential polls and asserted that democracy is strengthened not by… pic.twitter.com/2l0Fl3eyzt
— Press Trust of India (@PTI_News) September 9, 2025
विरोधी पक्षांच्या नेत्यांनी संयुक्त उमेदवार म्हणून संधी दिली त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. आपली लोकशाही फक्त विजयानं मजबूत होत नाही तर संवाद, मतभिन्नता आणि सहभाग यानं मजबूत होते. नागरिक म्हणून आणि समता, स्वातंत्र्य आणि स्वातंत्र्या आदर्शांचं रक्षण करण्यास कटिब्ध आहे. आपल्या राष्ट्रीय जीवनासाठी संविधान मार्गदर्शन करत राहो. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत विजयी झालेल्या सीपी राधाकृष्णन यांना शुभेच्छा, त्यांचा कार्यकाळ देशसेवेसाठी यशस्वी ठरो.. असं बी. सुदर्शन रेड्डी यांनी म्हटले आहे.
राधाकृष्णन यांचा 152 मतांनी विजय, 15 मते अवैध
निवडणूक अधिकारी पीसी मोदी यांनी सांगितले की, एकूण 15 मते अवैध ठरली. त्यामुळे 767 पैकी 752 मतांचीच गणना झाली. यात सीपी राधाकृष्णन यांनी 452 मते मिळवत बी. सुदर्शन रेड्डी यांचा 152 मतांच्या मोठ्या फरकाने पराभव केला.
मतदान प्रक्रिया आणि सहभाग
मतदान सकाळी १० वाजता सुरू झाले आणि सायंकाळी ५ वाजेपर्यंत चालले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वप्रथम मतदान केले. त्यानंतर केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, अर्जुन राम मेघवाल, किरेन रिजिजू, राज्यसभेचे उपसभापती हरिवंश, भाजप खासदार कंगना रनौत आणि सपा नेते राम गोपाल यादव यांच्यासह अनेक नेत्यांनी मतदान केले. काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही मतदानात सहभाग घेतला.





