Sheffield Shield 2020-21 | बुमराहचा ऑस्ट्रेलियन अवतार

मेलबर्न – ऑस्ट्रेलियातील प्रसिद्ध देशांतर्गत स्पर्धा असलेल्या शेफिल्ड शिल्ड क्रिकेट स्पर्धेत भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचा अवतार दिसला व प्रेक्षकांनी टाळ्यांच्या गजरात त्याला दाद दिली.
ऑस्ट्रेलियातील क्रिकेट चाहते म्हणजे गर्दी नसते तर दर्दी असते. त्यामुळे बुमराहच्या अवे फ्रॉम द बॉडी शैलीने नीक मेडीसन याने गोलंदाजी करत सगळ्यांच्याच चेहऱ्यावर हास्य फुलवले. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात व्हिक्टोरीया व वेस्टर्न ऑस्ट्रेलिया यांच्यातील लढतीत ही घटना घडली.
मेडीसन व्हिक्टोरीयाकडून खेळत असताना त्याने बुमराहच्या शैलीने गोलंदाजी केली. जेव्हा भारतीय संघात बुमराहने पदार्पण केले तेव्हा त्याची गोलंदाजी शैली पाहून प्रेक्षक, समालोचक यांच्यासह खुद्द तत्कालीन भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली देखील अवाक झाला होता.
राउंड आर्म अवे फ्रॉम द बॉडी या शैलीने गोलंदाजी करत बुमराह कीती यशस्वी ठरेल अशी शंकाही त्यावेळी व्यक्त केली गेली मात्र, आज बुमराह भारतीय संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज बनला असल्याने त्याच्या शैलीची कॉपी करण्याची हौस अनेकांना असल्याचेच मेडीसनच्या उदाहरणावरून दिसून येते.





