माळेगाव कारखाना निवडणूक: दुसऱ्या फेरीला सुरुवात; नीलकंठेश्वर पॅनलचे १६ तर सहकार बचावचे ४ उमेदवार आघाडीवर

बारामती : लक्षवेधी ठरलेल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा निकालास दिरंगाई होताना दिसत आहे. २४ तासाच्या मतमोजणीनंतर केवळ एकच फेरी झाली आहे. आज सकाळी पुन्हा दुसऱ्या फेरीची मतमोजणी सुरू करण्यात आली आहे. आज दिवसभर दुसऱ्या फेरीची मतमोजणी सुरू राहील. पहिल्या फेरी अखेर नीलकंठेश्वर पॅनलच्या १६ उमेदवारांची आघाडी तर सहकार बचाव पॅनलच्या ४ उमेदवारांनी आघाडी घेतली आहे. ब वर्गातून अजित पवार यांनी विजय संपादन केला आहे.
तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत 24 तास उलटल्यानंतरही एकच फेरी संपली असून दुसऱ्या फेरीच्या मतमोजणीची तयारी सुरू झाली आहे. दुसऱ्या फेरीची मतमोजणी देखील प्रदीर्घ काळ चालण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, पहिल्या फेरीमध्ये अजित पवार यांच्यासह २१ उमेदवारांपैकी तब्बल १७ जागांवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील नीलकंठेश्वर पॅनलचे उमेदवार आघाडीवर असून चंद्रराव तावरे यांच्या सहकार बचाव पॅनलचे उमेदवार चार जागांवर आघाडीवर आहेत.
तावरे यांच्या पॅनल मधून स्वतः चंद्रराव तावरे व रणजीत खलाटे सांगवी गटातून वीरसिंह गवारे बारामती गटातून व राजश्री कोकरे महिला राखीव मतदार संघातून आघाडीवर आहेत. दुसऱ्या फेरीमध्ये नेमके काय चित्र होते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. काही गटांमध्ये असणारा फरक हा किरकोळ असून या गटांमध्ये कोण आघाडी घेत बाजी मारतो याकडे आज दिवसभरात सर्वांचे लक्ष असेल.
पहिल्या फेरी अखेर मिळालेली उमेदवार निहाय मते खालीलप्रमाणे
अनुसूचित जाती जमाती मतदारसंघ
कुमार भोसले अजित पवार गट-4117
बापूराव गायकवाड चंद्रराव तावरे गट-3717
इतर मागास प्रवर्ग
नितीन कुमार वामनराव शेंडे अजित पवार गट -4120
रामचंद्र नाळे चंद्रराव तावरे गट -3644
भटक्या जाती जमाती प्रवर्ग
विलास ऋषिकांत देवकाते अजित पवार गट- 4269
सूर्याची तात्यासो देवकाते चंद्रराव तावरे गट- 3288
महिला राखीव प्रवर्ग
संगीता बाळासाहेब कोकरे- अजित पवार गट -2161
राजश्री कोकरे चंद्रराव तावरे गट 2022
ज्योती मुलमुले अजित पवार गट -1959
माळेगाव गट
रणजीत जाधवराव अजित पवार गट 4332
बाळासाहेब तावरे अजित पवार गट 3803
राजेंद्र बुरुंगले अजित पवार गट 3707
संग्राम काटे चंद्रराव तावरे गट 3425
रमेश गोफणे चंद्रराव तावरे गट 2963
रंजन कुमार तावरे चंद्रराव तावरे गट 3587
पणदरे गट
तानाजी कोकरे अजित पवार गट 3803
योगेश जगताप अजित पवार गट 4110
स्वप्निल जगताप अजित पवार गट 3716
रोहन कोकरे चंद्रराव तावरे गट 3314
रणजीत जगताप चंद्रराव तावरे गट 3050
सत्यजित जगताप चंद्रराव तावरे गट 3247
सांगवी गट
गणपत खलाटे अजित पवार गट 4115
विजय तावरे अजित पवार गट 3645
वीरेंद्र तावरे अजित पवार गट 3332
चंद्रराव तावरे -4041
संजय खलाटे चंद्रराव तावरे गट-2961
रणजीत खलाटे चंद्रराव तावरे गट -3747
खांडज शिरवली गट
प्रताप आटोळे अजित पवार गट 3995
सतीश फाळके अजित पवार गट 4117
मेघा शाम पोंदकुले चंद्रराव तावरे गट -3145
विलास सस्ते चंद्रराव तावरे गट- 3285
नीरा वागज गट
जयपाल देवकाते अजित पवार गट-3862
अविनाश देवकते अजित पवार गट- 4289
केशव देवकाते चंद्रराव तावरे गट- 3179
राजेश देवकते चंद्रराव तावरे गट- 3254
बारामती गट
नितीन सातव अजित पवार गट 3559
देविदास गावडे अजित पवार गट 3898
वीरसिंह गवारे चंद्रराव तावरे गट 3740
गुलाबराव गावडे चंद्रराव तावरे गट 3542
ब वर्ग प्रवर्ग
अजित अनंतराव पवार -91
भालचंद्र बापूराव देवकाते – चंद्रराव तावरे गट 10 मते





