Cooper Connolly : प्रीती झिंटाचा मास्टरस्ट्रोक यशस्वी! ऑक्शनमध्ये बोली लागताच ‘या’ खेळाडूची तळपली बॅट

कूपर कॉनोलीची ‘पॉवरफुल’ फटकेबाजी –
बिग बॅश लीग २०२५-२६ च्या एका रोमांचक सामन्यात पर्थ स्कॉर्चर्स आणि ब्रिस्बेन हीट आमनेसामने आले होते. ब्रिस्बेन हीट-ने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला, मात्र पर्थच्या फलंदाजांनी हा निर्णय चुकीचा ठरवला. पर्थ स्कॉर्चर्सने २० षटकांत ६ गड्यांच्या मोबदल्यात २५७ धावांचा डोंगर उभा केला.
Massive hit! Connolly sends the Eagle’s delivery soaring into the second tier! 💥 #GoldenMoment #BBL15 pic.twitter.com/DVxXRm6zyU
— KFC Big Bash League (@BBL) December 19, 2025
या विशाल धावसंख्येत कूपर कॉनोलीचा वाटा सिंहाचा होता. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या कॉनोलीने अवघ्या ३७ चेंडूंत ७७ धावांची स्फोटक खेळी केली. २०८ च्या स्ट्राइक रेटने खेळताना त्याने ६ चौकार आणि ६ षटकार ठोकले. विशेष म्हणजे, पंजाब किंग्सने त्याला ऑक्शनमध्ये खरेदी केल्यानंतरचा हा त्याचा पहिलाच मोठा सामना होता, ज्यामध्ये त्याने आपली क्षमता सिद्ध केली.
हेही वाचा – 1X Betting App Case : ईडीची मोठी कारवाई! युवराज सिंग, सोनू सूदसह ‘या’ सेलिब्रिटींची मालमत्ता जप्त
केकेआरसाठी पण आनंदाची बातमी –
याच सामन्यात न्यूझीलंडच्या फिन ॲलनने देखील तुफान फलंदाजी केली. आयपीएल २०२६ मध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून (KKR) खेळणाऱ्या ॲलनने सलामीला येत ३८ चेंडूंत ७९ धावा कुटल्या. यात त्याने ८ उत्तुंग षटकार मारले. त्याच्या या खेळीमुळे पर्थला मोठी धावसंख्या गाठता आली.
पंजाब किंग्ससाठी ‘व्हॅल्यू फॉर मनी’ –
पंजाब किंग्सने यंदाच्या मिनी ऑक्शनमध्ये मोजकेच खेळाडू खरेदी करून आपला संघ पूर्ण केला आहे. कॉनोलीने याआधीच्या सामन्यातही ३१ चेंडूंत ५९ धावा केल्या होत्या. त्याची सातत्यपूर्ण कामगिरी, डाव्या हाताने केलेली आक्रमक फलंदाजी आणि उपयुक्त गोलंदाजी पाहता, आयपीएल २०२६ मध्ये तो पंजाबसाठी ‘एक्स-फॅक्टर’ ठरू शकतो.





