Yuvraj Singh and Sonu Sood 1X Betting App Case : ऑनलाइन बेटिंग (सट्टेबाजी) विश्वातील नामांकित अॅप ‘१एक्स बेट’शी (1XBet) संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत भारतीय क्रिकेट संघाचे माजी दिग्गज खेळाडू युवराज सिंग आणि रॉबिन उथप्पा यांच्यासह बॉलिवूडमधील अनेक प्रसिद्ध कलाकारांच्या कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तेवर जप्ती आणली आहे. ईडीच्या या धडक कारवाईमुळे क्रीडा आणि मनोरंजन विश्वात एकच खळबळ उडाली आहे. नेमकी कारवाई काय? ईडीने आज केलेल्या या कारवाईत एकूण ७.९३ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली. जप्त करण्यात आलेल्या मालमत्तेमध्ये युवराज सिंग आणि रॉबिन उथप्पा या क्रिकेटपटूंसोबतच अभिनेत्री उर्वशी रौतेला, अभिनेता सोनू सूद, मिमी चक्रवर्ती, अंकुश हजारा आणि नेहा शर्मा यांचा समावेश आहे. १एक्स बेट या ऑनलाइन बेटिंग प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून झालेल्या आर्थिक गैरव्यवहाराचा तपास सध्या सुरू आहे. यापूर्वी याच प्रकरणात ईडीने शिखर धवन आणि सुरेश रैना यांचीही मालमत्ता जप्त केली होती. आतापर्यंत या संपूर्ण प्रकरणात एकूण १९.०७ कोटी रुपयांच्या मालमत्तेवर टाच आणण्यात आली आहे. कारवाईचे कारण काय? ‘१एक्स बेट’ हे एक परदेशी ऑनलाइन सट्टेबाजीचे अॅप असून, भारतात त्याला कायदेशीर मान्यता किंवा अधिकृत परवानगी नाही. असे असूनही, अनेक नामांकित सेलिब्रिटींनी या अॅपच्या जाहिराती आणि प्रमोशनमध्ये सहभाग घेतला होता. हेही वाचा – AUS vs ENG : ॲलेक्स कॅरीचा दमदार डबल धमाका! ऑस्ट्रेलियासाठी 12 वर्षांनंतर ‘या’ खास पराक्रमाची केली पुनरावृत्ती ईडीच्या तपासातील मुख्य मुद्दे: बेकायदेशीर मानधन : सेलिब्रिटींनी या अॅपच्या प्रमोशनसाठी घेतलेले मानधन आणि त्यातून झालेली आर्थिक उलाढाल ही मनी लॉन्ड्रिंगच्या (आर्थिक गैरव्यवहार) कक्षेत येते. प्रोत्साहन: बेकायदेशीर ऑनलाइन बेटिंगला प्रोत्साहन दिल्याचा आणि त्यातून अनधिकृत आर्थिक फायदा मिळवल्याचा ठपका या सेलिब्रिटींवर ठेवण्यात आला आहे. हेही वाचा – Kapil Dev : ‘गंभीर हा मॅनेजर असू शकतो, कोच नाही!’, कपिल देव यांच वक्तव्य; म्हणाले, तो लेगस्पिनरला काय शिकवणार? ऑनलाइन सट्टेबाजीच्या माध्यमातून होणारी ही आर्थिक लूट रोखण्यासाठी ईडीने आता आपले पाऊल अधिक कडक केले आहे. आगामी काळात या प्रकरणात आणखी काही बड्या नावांची चौकशी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.