Australia tour of England, 2024 : ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या टी-20 आणि वनडे मालिकेसाठी इंग्लंड संघाची घोषणा…

लंडन – झालेल्या दुखापतीमुळे इंग्लंडचा कर्णधार असलेल्या जोस बटलरचा समावेश ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी करण्यात आलेला नाही. त्याची दुखापत गंभीर असल्यास तो आगामी एकदिवसीय मालिकेसाठी देखील मुकू शकतो.
येत्या 11 सप्टेंबरपासून ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणाऱ्या टी-20 लढतीसाठी इंग्लंड संघाची घोषणा करण्यात आली आहे. मालिकेतील दुसरा सामना 13 आणि तिसरा सामना 15 सप्टेंबरला होणार आहे. या मालिकेसाठी कर्णधार जोस बटलरच्या अनुपस्थितीत फिल सॉल्ट कर्णधारपदाची धुरा सांभाळणार आहे. जोश बटलरच्या जागी जेमी ओव्हरटनला टी-20 संघात स्थान देण्यात आले आहे.
त्यानंतर 19 सप्टेंबरपासून इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघाच्या दरम्यान पाच सामान्यांची (दुसरा सामना 21 सप्टेंबर, तिसरा 24 सप्टेंबर, चौथा सामना 27 सप्टेंबर आणि पाचवा सामना 29 सप्टेंबर) एकदिवसीय मालिका रंगणार आहे. या दोन आठवड्यांच्या कालावधीत बटलर तंदुरुस्त झाला नाही तर जॉर्डन कॉक्स इंग्लंड संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे.
इंग्लंडचा टी-20 संघ : फिल सॉल्ट (कर्णधार), जोफ्रा आर्चर, जेकब बेथेल, ब्रायडन कार्स, जॉर्डन कॉक्स, सॅम करन, जोश हल, विल जॅक्स, लियाम लिव्हिंगस्टोन, साकिब महमूद, डॅन मौसली, जेमी ओव्हरटन, आदिल रशीद, रीस टोपले, जॉन टर्नर.
इंग्लंड एकदिवसीय संघ: जोस बटलर (कर्णधार), जोफ्रा आर्चर, गस ऍटकिन्सन, जेकब बेथेल, हॅरी ब्रूक, ब्रायडन कार्स, जॉर्डन कॉक्स, बेन डकेट, जोश हल, विल जॅक्स, मॅथ्यू पॉट्स, आदिल रशीद, फिल सॉल्ट, जेमी स्मिथ, रीस टोपली, जॉन टर्नर.





