Pat Cummins : पॅट कमिन्सचा अॅशेस मालिकेसाठी जीवतोड प्रयत्न: तंदुरुस्तीचा धोका पत्करणार?

डब्ल्यूटीसी फायनलनंतर कमिन्स फारच कमी सामने खेळू शकला. तो न्यूझीलंड आणि भारताविरुद्धच्या आगामी मर्यादित षटकांच्या मालिकेत तसेच ॲशेसपूर्वीच्या शेफील्ड शील्ड सामन्यांमध्ये सहभागी होऊ शकणार नाही. तरीही, कमिन्सला आशा आहे की, 21 नोव्हेंबरपासून पर्थ येथे सुरू होणाऱ्या कसोटी सामन्यापूर्वी तो पूर्णपणे तंदुरुस्त होईल.
ॲशेससाठी सर्वस्व पणाला –
बुधवारी ‘क्रिकेट.कॉम.एयू’शी बोलताना कमिन्स म्हणाले, “जोपर्यंत मला खात्री नाही की मी संपूर्ण कसोटी सामना खेळू शकतो, तोपर्यंत मी कसोटीत उतरणार नाही. 18-19 व्या वर्षी तुम्ही विचार करता की, पुनर्वसन परिपूर्ण करायचे, मग त्यासाठी सहा महिने जास्त लागले तरी चालतील. पण आता माझी मानसिकता अशी आहे की, ही ॲशेस मालिका आहे, आणि त्यात खेळण्यासाठी जे काही करावे लागेल, ते मी करेन.”
हेही वाचा – Asia Cup 2025 : भारताला आशिया कपमध्ये ‘या’ पठाण गँगपासून राहावे लागणार सावध, कधीही करु शकते मोठा उलटफेर
तथापि, त्यांनी हेही स्पष्ट केले की, जर तो शंभर टक्के तंदुरुस्त नसेल आणि पुढील वर्षी विश्रांतीची गरज भासली, तर आणखी एक ॲशेज मालिका येईल. वैद्यकीय तपासणीत कमिन्सच्या कमरेच्या दुखापतीचा खुलासा झाला असून, वेस्टइंडीजविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतरही ही दुखापत त्याला त्रास देत आहे.
हेही वाचा – MS Dhoni : नाद करा पण माहीचा कुठं…! बॉलिवूड अन् क्रिकेटच्या दोन्ही किंगना मागे टाकत रचला नवा इतिहास
तयारीसाठी कमी वेळ, तरीही आत्मविश्वास –
ॲशेस मालिकेचे महत्त्व अधोरेखित करताना पॅट कमिन्स सांगितले की, तज्ज्ञ एका महिन्याने त्याच्या दुखापतीचा पुन्हा आढावा घेतील. तो म्हणाला, “शेफील्ड शील्ड सामने खेळले नाहीत, तरीही अॅशेसच्या तयारीसाठी मला फार कमी वेळ लागेल. मी हा धोका पत्करण्यास तयार आहे.” जूनमध्ये लॉर्ड्स येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या डब्ल्यूटीसी फायनलमध्ये कमिन्सने चार दिवसांत 35.1 षटके टाकली होती.





