AUS vs ENG : तिसऱ्या कसोटीपूर्वी हाय-व्होल्टेज ड्रामा! इंग्लंड संघाच्या सुरक्षा रक्षकाची कॅमेरामॅनशी झटापट, पाहा VIDEO

England Team security guard clash cameraman : ॲशेस मालिकेत ऑस्ट्रेलियाकडून ०-२ अशी मोठी पिछाडी मिळाल्यानंतर इंग्लंडचा संघ आता ॲडलेड येथे तिसऱ्या कसोटीसाठी सज्ज होत आहे. मात्र, या महत्त्वपूर्ण सामन्यापूर्वी पाहुणा संघ एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. ब्रिस्बेन विमानतळावर इंग्लंड संघाच्या सुरक्षा कर्मचाऱ्याची आणि एका मीडिया कॅमेरा ऑपरेटरची जोरदार शाब्दिक बाचाबाची झाली, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
विमानतळावर कॅमेरा ऑपरेटरशी झाली झटापट –
ही घटना तेव्हा घडली जेव्हा इंग्लंडचे खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ ब्रिस्बेनहून ॲडलेडसाठी रवाना होत होते. प्रसारित झालेल्या फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, संघाचा एक सुरक्षा रक्षक कॅमेरा ऑपरेटरला ढकलत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कॅमेरा ऑपरेटर खेळाडूंच्या खूप जवळ जाऊन दृश्ये घेण्याचा प्रयत्न करत होता, ज्यावर सुरक्षा कर्मचाऱ्याने आक्षेप घेतला. सुदैवाने, या झटापटीत कोणीही जखमी झाल्याची नोंद नाही.
Ashes tension rarely extends beyond the playing field, but it did on Saturday in an ugly incident at Brisbane Airport. An aggressive security guard for the England cricket team manhandled a 7NEWS camera operator simply doing his job. Players didn’t seem bothered. pic.twitter.com/OHQJ7TiwCh
— 7NEWS Queensland (@7NewsBrisbane) December 13, 2025
सलग दुसऱ्या पराभवानंतर वातावरण तापले –
हा व्हिडीओ समोर आल्यानंतर हे प्रकरण चर्चेत आले आहे. विशेष म्हणजे, संपूर्ण ॲशेस दौऱ्यादरम्यान इंग्लंडच्या संघाचे माध्यमांप्रति असलेले वर्तन शांत आणि सहकार्याचे राहिले होते. पहिल्या दोन कसोटीत झालेल्या मोठ्या पराभवानंतर संघावर सतत टीका होत आहे, ज्यामुळे सध्या वातावरण तणावपूर्ण झाले आहे.
हेही वाचा – IPL 2026 Auction पूर्वी CSK च्या माजी खेळाडूला मोठा धक्का! बॉलिंग ॲक्शनवर गंभीर प्रश्न उपस्थित
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने ॲशेस मालिकेदरम्यान मीडिया कव्हरेजसाठी स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. या नियमांनुसार, संघ प्रवासादरम्यान मुलाखतींसाठी उपलब्ध नसतील आणि विमानतळ कव्हरेज केवळ ‘सन्माननीय’ अंतरावरून घेतलेल्या छायाचित्रांपर्यंत आणि व्हिडिओंपर्यंत मर्यादित राहील. या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन होत असतानाही सुरक्षा कर्मचाऱ्याने केलेली धक्काबुक्की वादाचा विषय बनली आहे.
या लहानशा झटापटीकडे इंग्लंड संघाच्या बदललेल्या मनःस्थितीचे प्रतीक म्हणून पाहिले जात आहे. सततचा खराब खेळ आणि वाढती टीका यामुळे हा संघर्ष दौऱ्याच्या महत्त्वाच्या टप्प्यावर वाढत असलेला दबाव दर्शवतो.





