IND W vs AUS W : एलिसा हीलीच्या शतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय! भारताचा सलग दुसरा पराभव

IND W vs AUS W Australia beat India by 3 Wickets : आयसीसी महिला वनडे क्रिकेट विश्वचषक 2025 च्या 13व्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा 3 गडी राखून पराभव केला. ऑस्ट्रेलियाच्या या विजयाची नायिका ठरली कर्णधार एलिसा हीली. तिने 142 धावांची खणखणीत खेळी करत भारताच्या विजयाच्या आशा धुळीस मिळवल्या. विशेष म्हणजे भारतीय संघाला सलग दुसऱ्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे भारताच्या अडचणी वाढल्या आहेत.
भारताची दमदार फलंदाजी: मंधाना-रावलची अर्धशतके –
ऑस्ट्रेलियन कर्णधार हीलीने नाणेफेक जिंकून प्रथम भारताला फलंदाजीचे आमंत्रण दिले होते. स्मृती मंधाना आणि प्रतिका रावल यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारतीय संघाने ऑस्ट्रेलियासमोर 330 धावांचा डोंगर उभा केला. मंधाना आणि रावल यांनी पहिल्या गड्यासाठी 155 धावांची भक्कम भागीदारी केली. मंधानाने 66 चेंडूत 121 च्या स्ट्राइक रेटने 80 धावा केल्या, तर रावलने 96 चेंडूत 75 धावा फटकावल्या.
Australia and India put on a spectacular show in Visakhapatnam 🫡
Get your #CWC25 tickets for their coming games now ➡️ https://t.co/jFmHgx1KZP pic.twitter.com/dbTALkAt9W
— ICC (@ICC) October 12, 2025
याशिवाय हरलीन देओलने 38, कर्णधार हरमनप्रीत कौरने 22, जेमिमा रॉड्रिग्सने 33, ऋचा घोषने 32 आणि अमनजोत कौरने 16 धावांचे योगदान दिले. मात्र, शेवटच्या फलंदाजांना हा धावसंख्या 350 च्या पुढे नेण्यात अपयश आले. ऑस्ट्रेलियाकडून एनाबेल सदरलँडने सर्वाधिक 5 गडी बाद केले, तर सोफी मोलिन्यूक्सने 3 आणि मेगन शटने 1 गडी बाद केला.
हेही वाचा – Rinku Singh : रिंकू सिंह प्रकरणात धक्कादायक खुलासा ! आरोपी मोहम्मद नौशादचा आणखी एक कारनामा उघडकीस
खराब गोलंदाजीमुळे भारताचा पराभव –
Alyssa Healy’s masterclass against India continued the Australian juggernaut in #CWC25 👊
She is the @aramco POTM for her match-winning ton ⚡ pic.twitter.com/BsI8VvsJSk
— ICC (@ICC) October 12, 2025
भारताच्या पराभवाचे प्रमुख कारण ठरले त्यांची खराब गोलंदाजी. 330 धावांचा विशाल लक्ष्याचा बचाव करण्यात भारतीय गोलंदाजांना अपयश आले. श्री चरणी आणि दीप्ति शर्मा यांच्याव्यतिरिक्त एकाही गोलंदाजाची इकॉनॉमी 7 पेक्षा कमी राहिली नाही. अमनजोत कौरने 9 षटकांत 7.60 च्या इकॉनॉमीने 68 धावा दिल्या, तर स्नेह राणाने 10 षटकांत 8.50 आणि क्रांति गौडने 8.10 च्या इकॉनॉमीने धावा खर्च केल्या.श्री चरणीला 3, तर अमनजोत कौर आणि दीप्ति शर्माला प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.
एलिसा हीलीची वादळी शतकी खेळी –
ऑस्ट्रेलियाच्या या ऐतिहासिक विजयाचे श्रेय कर्णधार एलिसा हीलीला जाते. तिने 107 चेंडूत 142 धावांची विस्फोटक खेळी केली, ज्यात 21 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता. तिचा स्ट्राइक रेट 132.71 होता. फीबी लिचफील्डने 40 धावा, एलिस पेरीने नाबाद 47 धावा आणि अॅश्ले गार्डनरने 45 धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले. किम गार्थ 14 धावांवर नाबाद परतली. ऑस्ट्रेलियाने 7 चेंडू शिल्लक असताना हे लक्ष्य गाठले.
भारताचा सलग दुसरा पराभव –
या विश्वचषकात भारताचा हा सलग दुसरा पराभव आहे. यापूर्वी हरमनप्रीत कौरच्या संघाला दक्षिण आफ्रिकेकडून पराभव पत्करावा लागला होता. खराब गोलंदाजीमुळे भारताला या सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले, आणि यापुढेही गोलंदाजीतील सुधारणा भारतीय संघासाठी आव्हान ठरणार आहे.





