AUS vs SA : लुंगी एनगिडीने रचला इतिहास! ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडेत ‘हा’ खास पराक्रम करणारा ठरला पहिलाच खेळाडू

AUS vs SA Lungi Ngidi’s stellar 5-wicket haul : दक्षिण आफ्रिका संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील दुसऱ्या सामन्यात 84 धावांनी विजय मिळवला. या विजयासह दक्षिण आफ्रिका संघाने मालिकेत 2-0 अशी अजेय आघाडी घेतली आहे. दक्षिण आफ्रिकेच्या या विजयात वेगवान गोलंदाज लुंगी एनगिडीने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्याने 5 विकेट्स घेत एका खास यादीत स्थान मिळवले.
लुंगी एनगिडी ठरला दक्षिण आफ्रिकेचा पहिला खेळाडू –
मकाय येथील स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना 49.1 षटकांत 277 धावांचा डोंगर उभा केला. प्रत्युत्तरात 278 धावांचा पाठलाग करणारा ऑस्ट्रेलिया संघ 37.4 षटकांत केवळ 193 धावांत गारद झाला. ऑस्ट्रेलियाला 193 धावांत रोखण्यात लुंगी एनगिडीने मोलाची कामगिरी केली.
LUNGI NGIDI STRIKES! 🎯 5 wickets for 42 runs – what a bowling masterclass!
The South African speedster was absolutely lethal today! 🔥🇿🇦 #LungiNgidi #SouthAfrica #Sportify pic.twitter.com/UPqxmMoZg6
— Sportify (@Sportify777) August 22, 2025
लुंगी एनगिडीने मार्नस लाबुशेन, जोश इंग्लिस, ॲरॉन हार्डी, झेव्हियर बार्टलेट आणि ॲडम झाम्पा यांचे महत्त्वपूर्ण विकेट्स घेतल्या. एनगिडीने 8.4 षटकांत 42 धावा देत 5 विकेट घेतल्या. या कामगिरीसह तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय सामन्यात दोनदा पाच विकेटस घेणारा दक्षिण आफ्रिकेचा पहिला खेळाडू ठरला. शिवाय, जागतिक क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय सामन्यात दोन किंवा त्याहून अधिक वेळा पाच विकेट्स घेणारा तो केवळ चौथा खेळाडू आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे सामन्यात दोन किंवा अधिक वेळा 5 विकेट्स घेणारे खेळाडू:
- कर्टली ॲम्ब्रोस: 3 वेळा
- शेन बाँड: 3 वेळा
- ट्रेंट बोल्ट: 2 वेळा
- लुंगी एनगिडी: 2 वेळा
हेही वाचा – Asia Cup 2025 : ‘जो आवडत नाही, त्याला तो संघातून वगळतो…’, गौतम गंभीरवर माजी भारतीय खेळाडूचा गंभीर आरोप
लुंगी एनगिडीचे ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनेड सामन्यातील दमदार प्रदर्शन –
लुंगी एनगिडीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय सामन्यांमध्ये आतापर्यंत अप्रतिम कामगिरी केली आहे. त्याने 11 सामन्यांत 16.96 च्या सरासरीने एकूण 26 विकेट्स घेतल्या असून, त्याचा इकॉनॉमी रेट 5.03 आहे. या मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामना 24 ऑगस्ट रोजी मकाय येथील मैदानावर खेळवला जाईल.





