Online Gaming Bill 2025 : BCCI च्या जर्सी प्रायोजकावर टांगती तलवार; ड्रीम11 चे भवितव्य धोक्यात! नक्की कारण काय? जाणून घ्या

Online Gaming Bill 2025 Updates : बीसीसीआय हे क्रिकेट विश्वातील व्यवसायाचे पारस आहे. ज्या कंपनीवर बीसीसीआयचा हात पडतो, ती हीरा बनते, अशी ख्याती आहे. क्रिकेटपटूंना धनकुबेर बनवणाऱ्या या मंडळाशी जोडले जाण्यासाठी कंपन्यांमध्ये चढाओढ असते. जर्सी प्रायोजकत्वासाठी कंपन्या कोट्यवधी रुपये मोजायला तयार असतात. प्रत्येक सामन्यात खेळाडू प्रायोजकाच्या नावाने सजलेली जर्सी परिधान करतात, आणि यातून प्रायोजक कंपन्यांना मोठा फायदा होण्याची अपेक्षा असते. पण, हा व्यवहार जितका आकर्षक वाटतो, तितकाच जोखमीचा आहे.
2001 नंतर प्रत्येक प्रायोजक संकटात –
2001 नंतर भारतीय क्रिकेट संघाला प्रायोजित करणारी प्रत्येक कंपनी कोणत्या ना कोणत्या कायदेशीर किंवा आर्थिक संकटात सापडली आहे. या यादीत आता ड्रीम11 हे नवे नाव जोडले गेले आहे. 2023 मध्ये भारतीय क्रिकेट संघाचे जर्सी प्रायोजक बनलेली ड्रीम11 कंपनी सध्या अनिश्चिततेच्या गर्तेत आहे. 21 ऑगस्ट 2025 रोजी भारत सरकारने ऑनलाइन गेमिंग विधेयक 2025 मंजूर केल्यानंतर ड्रीम11 अडचणीत सापडली आहे. या नव्या विधेयकानुसार, सर्व रियल-मनी गेमिंग अॅप्सवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे, मग ते नशीबावर आधारित असो वा कौशल्यावर.
ऑनलाइन गेमिंग विधेयक 2025 चा ड्रीम11 वर परिणाम
#OnlineGamingBill2025 मुळे युवकांची सट्टेबाजीपासून सुटका होईल. पालक आता सुरक्षित गेमिंग सुनिश्चित करु शकतील.#PreventSuicideRegulateOnlineGaming #GamingPolicyForPeopleNotProfits #PlaySocialGamesConnectSocially pic.twitter.com/zQKfwRqgYC
— आकाशवाणी समाचार छत्रपती संभाजीनगर (@airnews_arngbad) August 22, 2025
या विधेयकानुसार, ज्या अॅप्समध्ये रियल-टाइम मनी गेमिंगचा समावेश आहे, म्हणजेच जिथे पैसे लावून अधिक पैसे कमावण्याची शक्यता आहे, अशा सर्व अॅप्सवर बंदी घालण्यात येईल. ड्रीम11 हे कौशल्यावर आधारित अॅप आहे, जिथे वापरकर्ते फँटसी क्रिकेट संघ तयार करतात आणि खेळाडूंच्या कामगिरीनुसार पैसे कमावण्यासाठी पैज लावतात. या विधेयकाच्या व्याख्येनुसार, ड्रीम11 देखील बंदीच्या कक्षेत येते.
हेही वाचा – Asia Cup 2025 : ‘जो आवडत नाही, त्याला तो संघातून वगळतो…’, गौतम गंभीरवर माजी भारतीय खेळाडूचा गंभीर आरोप
राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर बंदी लागू होणार –
हे विधेयक लोकसभा आणि राज्यसभेत मंजूर झाले असून, आता फक्त राष्ट्रपतींच्या मंजुरीची गरज आहे. मंजुरी मिळाल्यानंतर ड्रीम11सह सर्व रियल-मनी गेमिंग अॅप्सवर तात्काळ बंदी लागू होईल. त्यामुळे ड्रीम11 सध्या कायदेशीर अडचणींचा सामना करत आहे आणि बीसीसीआयच्या प्रायोजकांच्या यादीतील आणखी एक कंपनी म्हणून ती संकटात सापडली आहे. ड्रीम11 ही पहिली कंपनी नाही जी अशा संकटात सापडली आहे; यापूर्वीही अनेक कंपन्या बीसीसीआयशी भागीदारीनंतर अडचणीत आल्या आहेत.
ड्रीम11 चे प्रायोजकत्व संकटात –
2023 पासून 2026 पर्यंत भारतीय क्रिकेट संघाचे जर्सी प्रायोजक असलेली ड्रीम11 सध्या अनिश्चिततेचा सामना करत आहे. बीसीसीआयने सट्टेबाजी आणि रियल-मनी जुगाराशी संबंधित कंपन्यांबाबत सतर्क राहण्याच्या धोरणामुळे ड्रीम11 ची कायदेशीर वैधता तपासली जात आहे. यापूर्वी कंपनीला 1,200 कोटी रुपयांच्या जीएसटी चोरीप्रकरणी नोटीस बजावण्यात आली होती. एक नोटीस मागे घेण्यात आली असली, तरी जीएसटी अधिकाऱ्यांकडून नव्याने तपास होण्याची शक्यता आहे. यामुळे ड्रीम11 च्या भवितव्यावर टांगती तलवार आहे.





