AUS vs SA Final : रबाडाचा रौद्रावतार! WTC फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाची दाणादाण, बुमराहचा मोडला विक्रम

AUS vs SA Kagiso Rabada Breaks Bumrah’s Record in WTC Final 2025 : जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा म्हणजेच डब्ल्यूटीसी २०२५ चा अंतिम सामना ललॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर खेळला जात आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेचा संघा आमनेसामने आहेत. ज्यामध्ये दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करताना शानदार सुरुवात केली आहे. पहिल्या १० षटकांतच कागिसो रबाडाच्या घातक गोलंदाजीने ऑस्ट्रेलियाच्या उस्मान ख्वाजा आणि कॅमेरॉन ग्रीनला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. त्याने यासह जसप्रीत बुमराहचा खास विक्रमही मोडला.
रबाडाच्या ५० विकेट्स पूर्ण –
दक्षिण आफ्रिकेचा अनुभवी वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाने ख्वाजा आणि ग्रीनला बाद करत ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये ५० विकेट्स पूर्ण केले. या बरोबरच त्याने जसप्रीत बुमराहचा विक्रमही मोडला. आतापर्यंत ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये ६४ गोलंदाजांनी ५० किंवा त्याहून अधिक विकेट्स घेतल्या आहेत, परंतु केवळ २ गोलंदाजांचा स्ट्राईक रेट ४० पेक्षा कमी आहे, ज्यामध्ये कागिसो रबाडा आणि जसप्रीत बुमराह यांचा समावेश आहे.
रबाडाने बुमराहचा विक्रम मोडला –
Kagiso Rabada lights up the first session of the #WTC25 Final with two wickets in an over 🤩
More 👉 https://t.co/LgFXTd0jRV pic.twitter.com/lzbtCyXNnE
— ICC (@ICC) June 11, 2025
- जसप्रीत बुमराहने ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळलेल्या १२ कसोटी सामन्यांमध्ये ३९.९ च्या सरासरीने ६४ विकेट्स घेतल्या आहेत.
- कागिसो रबाडाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ११ सामन्यांमध्ये ३८.८ च्या स्ट्राईक रेटने ५१ बळी घेतले आहेत.
हेही वाचा – ICC T20 Rankings : आयसीसी टी-२० क्रमवारीत उलटफेर; तिलक वर्माची बिनखेळता झेप, सूर्याची घसरण
ऑस्ट्रेलियाला १४६ धावांवर पाचवा धक्का –
सामन्याबद्दल बोलायचे, तर वृत्त लिहीपर्यंत ४२ षटकानंतर ऑस्ट्रेलिया संघाची धावसंख्या ५ बाद १४६ धावा आहे. मार्नस लाबुशेन (१७) ट्रॅव्हिस हेड (११) पण मार्को यान्सेनच्या जाळ्यात अडकले. यानंतर त्याने स्टीव्हन स्मिथलाही ६६ धावांवर झेलबाद करुन तंबूत पाठवले. अशा प्रकारे पहिल्या सत्रात दक्षिण आफ्रिकेच्या वेगवान गोलंदाजांनी निर्विवाद वर्चस्व गाजवले म्हणले तर चुकीचं ठरणार नाही. सध्या ब्यू वेबस्टर ३७ धावांवर खेळत आहे.





