Duleep Trophy 2025 : W, W, W, W, ४ चेंडू, ४ विकेट्स…! काश्मीरच्या औकिब नबीने धुमाकूळ घालत रचला इतिहास

Duleep Trophy 2025 Auqib Nabi hattrick : दुलीप ट्रॉफी 2025 मध्ये नॉर्थ झोन आणि ईस्ट झोन यांच्यातील सामन्यात नॉर्थ झोनने दमदार कामगिरी केली. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी नॉर्थ जोनने पहिल्या डावात 405 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात ईस्ट झोनची फलंदाजी कोलमडली आणि त्यांचा डाव 230 धावांवर आटोपला. नॉर्थ झोनचा वेगवान गोलंदाज औकिब नबी याने हॅट्रिकसह 5 बळी घेत ईस्ट झोनला सर्वात मोठा धक्का दिला. यासह जम्मू-काश्मीरचा 28 वर्षीय गोलंदाज औकिब नबीने दुलीप ट्रॉफीच्या इतिहासात नाव कोरलं.
औकिब नबीने रचला इतिहास –
औकिब नबीने विराट सिंग, मनीषी आणि मुख्तार हुसेन यांना सलग तीन चेंडूंवर बाद करत हॅट्रिक घेतली. यानंतर पुढील ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर सूरज सिंधु जैस्वालला बाद करत त्याने चार चेंडूंमध्ये चार विकेट्स घेतल्या. यानंतर त्याने मोहम्मद शमीला बाद करत 28 धावांत 5 विकेट्स घेतले, जे त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम प्रदर्शन आहे. दुलीप ट्रॉफीमध्ये हॅट्रिक घेणारा तो तिसरा गोलंदाज ठरला. यापूर्वी कपिल देव (1978) आणि साईराज बहुतुले (2001) यांनी ही कामगिरी केली होती.
🚨 𝗛𝗶𝘀𝘁𝗼𝗿𝘆 𝗠𝗮𝗱𝗲! 🚨
Auqib Nabi etches his name in the record books — the first-ever in Duleep Trophy and only the 4th Indian in first-class cricket to grab 4 wickets in 4 balls! 🔥🏏#AuqibNabi #DuleepTrophy2025 #IndianCricket #JammuAndKashmir #CricketHistory… pic.twitter.com/D6IT5hJQcj
— cricketmoodofficial (@cricketmoodcom) August 29, 2025
दुलीप ट्रॉफीच्या इतिहास हॅट्रिक घेणारे गोलंदाज –
- कपिल देव: नॉर्थ झोन वि. वेस्ट झोन, 1978
- साईराज बहुतुले: वेस्ट झोन वि. ईस्ट झोन, 2001
- औकिब नबी: नॉर्थ झोन वि. ईस्ट झोन, 2025
हेही वाचा – Manoj Tiwary : ब्रोंको टेस्ट म्हणजे रोहितला संघातून बाहेर काढण्याचा डाव? मनोज तिवारीचा खळबळजनक दावा!
ईस्ट झोनची निराशाजनक फलंदाजी –
ईस्ट झोनकडून विराट सिंगने सर्वाधिक 69 धावा केल्या, तर कर्णधार रियान परागने 39 धावा काढल्या. मात्र, औकिब नबीच्या भेदक गोलंदाजीसमोर इतर फलंदाज टिकू शकले नाहीत. औकिब व्यतिरिक्त, हर्षित राणाने 2 विकेट्स घेतल्या.
नॉर्थ झोन सामन्यात मजबूत स्थितीत –
नॉर्थ जोनने पहिल्या डावात 405 धावांचा डोंगर उभा केला असून, ईस्ट जोनच्या 230 धावांमुळे नॉर्थ जोनला पहिल्या डावात मोठी आघाडी मिळाली आहे. औकिब नबीच्या या ऐतिहासिक कामगिरीमुळे नॉर्थ झोन सामन्यात मजबूत स्थितीत आहे.





