Ranji Trophy 2025 : जम्मू-कश्मीरचा ऑकिब नबी दार वेगाचा नवा ‘बादशाह’…! १० विकेट्सह अष्टपैलू कामगिरीने वेधलं सर्वांचं लक्ष

ऑकिब नबीची दमदार कामगिरी –
ऑकिबने पहिल्या डावात केवळ २९ धावांत ३ विकेट्स घेत राजस्थानच्या फलंदाजांना चांगलाच दणका दिला. त्यानंतर फलंदाजीला आल्यावर त्याने ६५ चेंडूंमध्ये ८ चौकार आणि २ षटकारांसह ५५ धावांची धमाकेदार खेळी केली. मात्र, त्याच्या गोलंदाजीचा खरा जलवा दुसऱ्या डावात दिसला. ऑकिबने राजस्थानच्या फलंदाजीला अक्षरशः उद्ध्वस्त केले. त्याने ७ विकेट्स घेत राजस्थानचा डाव अवघ्या ८९ धावांत गुंडाळला. त्याच्या या भेदक गोलंदाजीमुळे राजस्थानचा फलंदाजी क्रम पत्त्यांप्रमाणे कोसळला.
जम्मू-काश्मीरचा दमदार विजय –
Auqib Nabi in the Ranji Trophy so far:
25.4-9-54-2 & 16-3-52-5 with the ball and 21 runs & 37 with the bat against Mumbai.
14-3-29-3 & 11-3-24-7 with the ball and 55 runs with the bat against Rajasthan.
17 wickets and 113 runs in just 4 innings and 2 matches. 🌟🔥#AuqibNabi pic.twitter.com/JwFlUhJX8k
— Saabir Zafar (@Saabir_Saabu01) October 27, 2025
पहिल्या डावात राजस्थानचा संघ १५२ धावांत सर्वबाद झाला. सुनील कुमारने ४ तर ऑकिबने ३ विकेट्स घेतल्या. प्रत्युत्तरात जम्मू-काश्मीरने २८२ धावा करत १३० धावांची आघाडी घेतली. युधवीर सिंह (५३) आणि ऑकिब नबी (५५) यांच्या अर्धशतकांनी संघाला मजबूत स्थितीत आणले. राजस्थानचा दुसरा डाव तर आणखी निराशाजनक ठरला. फक्त दोन फलंदाजांना दुहेरी आकडा गाठता आला, तर पाच फलंदाज शून्यावर बाद झाले. ऑकिबच्या भेदक गोलंदाजीसमोर राजस्थानचा डाव ८९ धावांतच संपुष्टात आला.
ऑकिब नबी: उदयोन्मुख तारा –
ऑकिब नबी दार याने आपल्या अष्टपैलू कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधले आहे. त्याच्या गोलंदाजीतील वेग आणि फलंदाजीतील आक्रमकता यामुळे तो जम्मू-काश्मीरच्या क्रिकेटसाठी मोठी आशा बनला आहे. त्याच्या या खेळीने रणजी ट्रॉफीच्या या हंगामात त्याला नवी ओळख मिळाली आहे. ऑकिबच्या या कामगिरीमुळे जम्मू-काश्मीरने हा सामना एकतर्फी जिंकला आणि क्रिकेट विश्वात एका नव्या ताऱ्याचा उदय झाल्याचे संकेत मिळाले.





