पापमोचनी एकादशीनिमित्त संत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिरात आकर्षक फुलांची सजावट

Pune | आज पापमोचनी एकादशी असल्याने आळंदी येथील संत संत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिरात विविध रंगी आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे.आकर्षक फुलांनी संजीवन समाधी मंदिरातील गाभारा अधिक फुलून दिसत असून मोठ्या प्रमाणामध्ये भाविकांनी श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी मंदिरात दर्शन घेण्यासाठी गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या निमित्ताने मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजनही संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीकडून करण्यात आले आहे.
पापमोचनी एकादशी म्हणजे काय ?
पापमोचनी एकादशी ही नावाप्रमाणे सर्व पापांचे नाश करणारी एकादशी आहे. हे व्रत सर्वांनी केले पाहिजे असे पुराणात म्हटले आहे. आपल्या हातून कळत नकळत घडलेल्या पापांचे परिमार्जन व्हावे यासाठी हे व्रत केले जाते. असे सांगितले जाते. कितीही प्रतिकूल परिस्थिती असो, त्या परिस्थितीत हे व्रत भक्तिभावाने केले असता भगवंताची कृपा लाभते, असे पूर्णात सांगण्यात आले आहे.





