एसटी कामगारांना भडकवण्याचा प्रयत्न केला जातोय – उपमुख्यमंत्री अजित पवार

जळोची – एसटीच्या संदर्भात मार्ग काढण्याचा प्रयत्न केला आहे. कर्मचाऱ्यांची पगारवाढ करण्यात आली आहे. शाळा सुरू झाल्या आहेत, मुलांना बस आवश्यक आहे, गोरगरिबांना प्रवासासाठी एसटी लागते. काही राज्याचा आढावा घेऊन पगारवाढ करण्यात आली आहे. एसटी कामगारांना भडकवण्याचा प्रयत्न केला जातोय.असा हट्टीपणा कधीच चालत नाही. अस सरकार चालू शकत नाही,अस केलं तरच आम्ही काम करू अस म्हणायला लागले तर ती संस्था कशी चालेल? आमची बळजबरी नाही विनंती आहे की, आम्ही काही पाऊल मागे सरकू त्यांनी पण काही पाऊल पाठीमागे सरकल पाहिजे, तसाच मार्ग निघेल. आज ही विनंती करतो. इथून पुढे बस घ्यायची तर सीएनजी किंवा इलेक्ट्रॉनिक बस घ्यायची. यामुळं प्रदूषण होत नाही. यातून सर्वांना फायदा होणार आहे. असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले. बारामती तालुक्यातील माळेगाव येथे आयोजित एका खासगी कार्यक्रमात पवार बोलत होते.
संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग रुंदीकरण कामाची पहाणी करताना, एका शेतकऱ्याने संपादीत जमिनीवर नव्याने आंब्याची झाडे लावल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निदर्शनास आले.
यावेळी बोलताना पवार म्हणाले, ज्या रस्त्याचे रुंदीकरण होणार आहे, तेवढ्याच जागेत त्या पट्ट्याने आंब्याची झाडे लावली आहेत. ज्या ठिकाणी त्याची हद्द सुरू होते तिथे एक आंब्याच झाड लावले नाही. सरकारला एवढं लुटू नका! सरकार तुमचंच आहे. हे बरोबर नाही हा जनतेचा पैसा आहे. असेही पवार म्हणाले.
ओमायक्रोनने शिरकाव केला आहे. याचा संसर्ग जात आहे, यात कोणी अद्याप दगावलेले आहे अस पाहण्यात आलं नाही. मात्र, काही फुटांवर बसलेल्या व्यक्तींला याची बाधा होऊ शकते. त्यामुळे सर्वांनी मास्कचा वापर करावा, शिवाय लसीकरणाचे दोन्ही डोस घेतलेले असावेत. अस उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नागरिकांना आवाहन केले आहे.





