Athiya Shetty : सुनील शेट्टीची लेक अथियाची आशा भोसलेंसाठी श्रद्धांजली पोस्ट; एका चुकीमुळे ट्रोल
Athiya Shetty: अनेकांनी आथिलाला तिचा 'बेजबाबदारपणा' म्हणत पोस्ट करण्यापूर्वी तिला नीट तपासणी करण्याचा सल्ला दिला

Athiya Shetty : दिग्गज गायिका आशा भोसले यांच्या निधनाने संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे. १२ एप्रिल २०२६ रोजी त्यांच्या निधनाची बातमी समोर येताच चाहत्यांसह रांजकीय, सामाजिक आणि मनोरंजन विश्वातील व्यक्तींनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. मात्र, याच दरम्यान अभिनेत्री अथिया शेट्टीच्या एका चुकीमुळे सोशल मीडियावर तिला ट्रोल केले जात आहे.
श्रद्धांजलीच्या पोस्टमध्ये मोठी चूक
अथिया शेट्टीने आशा भोसले यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती. मात्र, ही पोस्ट करताना तिने आशा ताईंच्या ऐवजी त्यांची मोठी बहीण दिवंगत लता मंगेशकर यांचा फोटो वापरला.
आपल्याकडून मोठी चूक झाल्याचे लक्षात येताच अथियाने तातडीने ती पोस्ट डिलीट केली आणि आशा भोसले यांचा फोटो वापरून नवीन पोस्ट शेअर केली. परंतु या पोस्टचे स्क्रीनशॉट वाऱ्यासारखे व्हायरल झाले. Athiya Shetty

Athiya Shetty : सुनील शेट्टीची लेक अथियाची आशा भोसलेंसाठी श्रद्धांजली पोस्ट; एका चुकीमुळे ट्रोल
अथिया शेट्टीच्या या चुकीवर नेटकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. अनेकांनी याला तिचा ‘बेजबाबदारपणा’ म्हटले असून पोस्ट करण्यापूर्वी नीट तपासणी करण्याचा सल्ला दिला. यावर अद्याप अभिनेत्रीकडून कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण आलेले नाही. Athiya Shetty
It’s really sad to see how careless people can be on serious matters.
Athiya Shetty shared a photo of Lata Mangeshkar ji while mourning Asha Bhosle ji is not just a small mistake, it shows a lack of attention.
The least one can do is check before posting, especially in such… pic.twitter.com/cEHXaXYoMh
— अंकुश (@ankushtweets) April 12, 2026
दरम्यान, अथिया आता बॉलिवूडपासून दूर आहे. पण सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. बॉलिवूडमध्ये तिला फारसे यश मिळवता आले नाही. यानंतर आता एका चुकीमुळे पुन्हा एकदा तिच्यावर टीका केली जात आहे.
आज होणार अंत्यसंस्कार
आशा भोसले यांच्यावर १३ एप्रिल २०२६ रोजी मुंबईत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी त्यांच्या लोअर परेळ येथील निवासस्थानी ठेवण्यात आले आहे. त्यानंतर, आज दुपारी ४ वाजता त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात येतील.
हेही वाचा:





