US Central Command: चर्चा फिस्कटल्यानंतर ट्रम्प ऍक्शन मोडमध्ये ; इराणला घालणार समुद्री वेढा, आजपासून पूर्णपणे नाकेबंदी
US Central Command: इस्लामाबादमध्ये अमेरिका आणि इराण यांच्यात झालेल्या अयशस्वी चर्चेनंतर आता डोनाल्ड ट्रम्प यांनी कठोर पावलं उचलायला सुरुवात केली आहे.

US Central Command: इस्लामाबादमध्ये अमेरिका आणि इराण यांच्यात झालेल्या अयशस्वी चर्चेनंतर आता डोनाल्ड ट्रम्प यांनी कठोर पावलं उचलायला सुरुवात केली आहे. आजपासून इराणच्या बंदरांची नाकेबंदी करण्यास सुरुवात होणार असल्याचे युएस सेंट्रल कमांडने म्हटले आहे.
इराणची बंदरे, किनारी भागात प्रवेश करणाऱ्या किंवा तिथून बाहेर पडणाऱ्या सर्व देशांच्या जहाजांविरोधात ही नाकेबंदी असणार असल्याचेही सेंटकॉमकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये यूएस सेंट्रल कमांडने, “राष्ट्राध्यक्षांच्या घोषणेनुसार त्यांचे सैन्य १३ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता इराणच्या बंदरांमध्ये प्रवेश करणाऱ्या आणि बाहेर पडणाऱ्या सर्व सागरी वाहतुकीची नाकेबंदी करण्यास सुरुवात करेल. ही नाकेबंदी इराणच्या बंदरांमध्ये आणि किनारी भागात प्रवेश करणाऱ्या किंवा बाहेर पडणाऱ्या सर्व देशांच्या जहाजांविरुद्ध निःपक्षपातीपणे लागू केली जाईल. US Central Command
यामध्ये अरबी समुद्र आणि ओमानच्या आखातातील इराणच्या सर्व बंदरांचा समावेश आहे. मात्र, जे जहाजे इराण सोडून इतर देशांच्या बंदरांकडे जाण्यासाठी ‘होर्मुझच्या सामुद्रधुनी’चा वापर करत आहेत, त्यांच्या नौकानयन स्वातंत्र्यात सेंटकॉमचे सैन्य कोणताही अडथळा आणणार नाही.अशी घॊशन केली आहे.
“नाकेबंदी सुरू होण्यापूर्वी व्यावसायिक नाविकांना औपचारिक सूचनेद्वारे अधिक माहिती दिली जाईल. सर्व नाविकांना असा सल्ला देण्यात येतो की, त्यांनी ‘नोटीस टू मरीनर्स’ प्रक्षेपणांचे निरीक्षण करावे आणि ओमानचे आखात तसेच होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये वावरताना ‘ब्रिज-टू-ब्रिज चॅनेल १६’ वर अमेरिकन नौदलाशी संपर्क साधावा”, असं आवाहनही सेंटकॉमकडून करण्यात आलं आहे.
होर्मुझच्या नाकेबंदीचे आदेश US Central Command:
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आता इराणला पुन्हा एकदा मोठा इशारा देत थेट होर्मुझ सामुद्रधुनीच्या नाकेबंदीचे आदेश दिले आहेत. ट्रम्प यांनी म्हटलं की, “होर्मुझ सामुद्रधुनीची नाकेबंदी तात्काळ लागू होईल.
मी जगातील सर्वोत्तम असलेल्या अमेरिकेच्या नौदलाला, आंतरराष्ट्रीय जलक्षेत्रात इराणला कोणतंही शुल्क दिलेल्या कोणत्याही जहाजाचा शोध घेऊन त्याला अडवण्याचे निर्देश दिले आहेत. अशा जहाजांना खुल्या समुद्रातून सुरक्षित मार्ग दिला जाणार नाही. तात्काळ प्रभावाने ही प्रक्रिया सुरू केली जाईल”, असा इशारा ट्रम्प यांनी दिला.
ट्रम्प यांच्या धमकीची खिल्ली US Central Command:
तर दुसरीकडे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मुझच्या सामुद्रधुनीवर नाकेबंदीची घोषणा केली, ज्यामुळे तेहरानने प्रत्युत्तर म्हणून हल्ला केला. इराणचे संसद अध्यक्ष मोहम्मद बागेर गालिबाफ यांनी होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांना रोखण्याच्या ट्रम्प यांच्या धमकीची खिल्ली उडवली.
तसेच अमेरिकेतील वाढत्या पेट्रोलच्या किमतींची आठवण करून दिली. त्यांनी व्हाईट हाऊसजवळील सध्याच्या पेट्रोलच्या किमतींचा एक फोटो शेअर करत, अमेरिकन लोकांना इशारा दिला की त्यांना लवकरच या किमती “आठवतील”.






