‘पाणी कुठल्या वळणावर…’, ठाकरे गटाच्या आमदाराला विखे पाटलांची महायुतीमध्ये येण्याची ऑफर

Radhakrishna Vikhe Patil । लोहारा तालुक्यातील करजखेडा येथे जलसंपदा विभागाच्या विविध विकासकामांच्या उद्घाटन कार्यक्रमादरम्यान जलसंपदा मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी हजेरी लावली होती. यावेळी विखे पाटलांनी भरसभेतच थेट उमरगा लोहाराचे आमदार शिवसेना ठाकरे गटाचे आमदार प्रवीण स्वामी यांना महायुती प्रवेशाची खुली ऑफर दिली आहे.
हे दोन्ही नेते या कार्यक्रमादरम्यान एकत्र आले होते. त्यावेळी आमदार प्रवीण स्वामी यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे मतदारसंघातील पाणीप्रश्न आणि अन्य विकासकामांसाठी मागणी केली. त्यावर राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्याला उत्तर देताना, “आमदार साहेब तुम्ही माझ्याकडे कामाची मागणी केली. पण तुम्हालाही हे आता कळलं पाहिजे की पाणी कुठल्या वळणावर आहे, त्यामुळे तुम्ही निर्णय घ्या, पाणी तर आम्ही, आमचे एनडीए सरकारच देणार,” असे म्हणत पक्षप्रवेशाची खुली ऑफरच दिली. Radhakrishna Vikhe Patil ।
प्रताप सरनाईक यांच्याशी प्रवीण स्वामींची भेट
देशासह राज्यात काँग्रेस, उद्धव ठाकरे गट हे सरकारच्या विरोधात आंदोलन करत आहे. तर दुसरीकडे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मात्र ठाकरे गटाच्या आमदाराने कामाची मागणी केल्यावर थेट महायुतीत येण्याची ऑफर दिल्याने राजकीय चर्चेला उधाण आले आहे. शिवसेनेचे मंत्री आणि धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्याशी स्वामींची जवळीक चर्चेत आली होती. Radhakrishna Vikhe Patil ।
११३ कोटी रुपयांचा भरीव निधी
दरम्यान, निम्म तेरणा उपसा सिंचन योजनेच्या दुरुस्ती कामाचे करजखेडा येथे राज्याचे जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते भुमीपुजन झाले. देवेंद्र फडणवीस सरकारने या दुरुस्तीच्या कामासाठी ११३ कोटी रुपयांचा भरीव निधी मंजूर केला आहे. या कामामुळे धाराशिव, लोहारा आणि औसा तालुक्यातील २३ गावातील क्षेत्र ओलिताखाली येणार आहे.
हेही वाचा :





