Devendra Fadnavis : अभिनेते किशोर कदम यांच्या मागणीची मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल; अधिकाऱ्यांना लक्ष घालण्याचे दिले आदेश

Devendra Fadnavis : मराठी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाने आणि कवितेच्या रुपाने प्रेक्षकांच्या मनात आपलं अढळ स्थान निर्माण करणारा अभिनेता किशोर कदम मोठ्या अडचणीत सापडले आहेत. त्यांनी फेसबुकवरून पोस्ट करत थेट मुख्यमंत्र्यांकडे मदतीची मागणी केली आहे. याचं कारण म्हणजे किशोर कदम यांचं अंधेरी, चकाला येथील राहतं घर धोक्यात आलं आहे. आता त्यांनी केलेल्या पोस्टची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली असून, अधिकाऱ्यांना या प्रकरणात लक्ष घालण्याच्या सूचना दिल्या आहेत.
सोशल मीडियाच्या फेसबुकवरून किशोर कदम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भावनिक पोस्ट लिहिली आहे. त्यांनी संपूर्ण प्रकार नेमका काय आहे? हे पोस्टमधून सांगितलं आहे. या पोस्टवर अनेकांनी प्रतिक्रिया देखील केल्या आहेत. त्यांनी इमारतीच्या पुनर्विकासात बिल्डर आणि पीएमसीच्या संगनमताने फसवणूक झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. या पोस्टमध्ये किशोर कदम यांनी मी आणि इतर 23 रहिवासी आमच्या छताखालील सुरक्षितता गमावण्याच्या मार्गावर आहोत, असं म्हटलं आहे.
काय म्हणाले सीएम फडणवीस?
महाराष्ट्रातील सर्व प्रमुख नेते ,मंत्री ,मुख्यमंत्री आणि तमाम जनतेला मी मदतीचे आवाहन करीत आहे. मेजॉरिटीच्या नावा खाली मी राहात असलेल्या सोसायटीमध्ये,रीडेव्हलपमेंटच्या प्रक्रियेत पीएमसी आणि बिल्डर यांनी संगनमताने कमिटी सभासदांची दिशाभूल करून आणि प्रचंड गोंधळ घालून माझे आणि इतर तेवीस सभासदांची राहाती घरे धोक्यात आणण्याची शक्यता निर्माण करून ठेवली आहे.
कमिटी मेम्बर्सनी काही महत्वाची कागदपत्र , अर्धवट माहिती आणि लपवाछपवी करून अंधेरी पूर्व चाकाला सारख्या अत्यंत प्राईम विभागात 33(11) आणि 33(12)B या DCPR खाली आमची इमारत SRA/स्लम डेव्हेलपमेंट खाली डेव्हलप करण्याचे ठरवले असल्याचे कालच आमच्या लक्षात आले आहे, असं किशोर कदम यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.
हेही वाचा : Kishore Kadam Post : अभिनेते किशोर कदम अडचणीत; राहत घर धोक्यात, पोस्टद्वारे मुख्यमंत्र्यांकडे मदतीची मागणी





