पुण्यात सहायक पोलीस उपनिरीक्षकाची आत्महत्या; महिन्याभरापूर्वी पत्नीचे निधन
Updated On:

पुणे – पोलीस दलाच्या मोटार परिवहन विभागातील सहायक पोलीस उपनिरीक्षकाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी उघडकीस आली. त्यांच्या पत्नीचे महिन्याभरापूर्वी निधन झाले होते. त्यामुळे नैराश्यातून त्यांनी हे पाऊल उचलले असावे, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
राजेश दगडू महाजन (50, रा. हरपळे वस्ती, हडपसर) असे सहायक उपनिरीक्षकाचे नाव आहे. पोलीस दलात रूजू होण्यापूर्वी महाजन हे लष्करात होते. तेथून सेवानिवृत्तीनंतर ते पोलीस दलात रूजू झाले होते. ते अत्यंत मनमिळावू स्वभावाचे असल्याचे त्यांच्या निकटवर्तींयांनी सांगितले आहे.
अपर पोलीस आयुक्त डॉ. जालिंदर सुपेकर म्हणाले, “नैराश्यातून त्यांनी हे पाऊल उचलले असल्याची शक्यता त्यांचे सहकारी व्यक्त करत आहेत.





