Voter List – मतदार यादीतील तुमचे नाव तुम्ही अनेक प्रकारे तपासू शकता. सर्वात सोपा मार्ग हा ऑनलाइनचा आहे. येथे तुम्हाला संपूर्ण तपशील मिळतो आणि तुम्हाला काही चूक आढळल्यास, तुम्ही दुरुस्तीसाठी अर्ज करू शकता.
अशी आहे प्रक्रिया –
– सर्व प्रथम https://voters.eci.gov.in/ वर जा.
– येथे अनेक पर्याय दिसतील, त्यापैकी तुम्हाला Search in Electoral Roll वर क्लिक करावे लागेल. तसेच थेट https://electoralsearch.eci.gov.in/ वर देखील जाऊ शकता.
– आता एक नवीन पेज उघडेल. येथे तुम्हाला तुमच्या मतदार ओळखपत्राचा तपशील द्यावा लागेल.
– तपशिलांमध्ये नाव, वय, जन्मतारीख, लिंग, राज्य आणि जिल्हा इत्यादी तपशील टाकावे लागतील.
– आता बॉक्समध्ये खाली दिलेला कॅप्चा कोड टाका आणि सर्च वर क्लिक करा.
– त्याच पेजवर तुम्हाला दुसरी लिंक मिळेल ज्यामध्ये EPIC क्रमांक, राज्य आणि कॅप्चा कोड टाकावा लागेल.
– यानंतर एक नवीन टॅब उघडेल आणि तुमचं नाव मतदार यादीत आहे की नाही हे तुम्ही तपासू शकाल.
याप्रमाणे एसएमएसद्वारे नाव तपासा –
– सर्वप्रथम तुमच्या मोबाईल फोनच्या टेक्स्ट मेसेजवर जा.
– येथे EPIC लिहा, जागा द्या आणि मतदार ओळखपत्र क्रमांक टाइप करा.
– आता हा संदेश 9211728082 किंवा 1950 वर पाठवा.
– यानंतर, तुमच्या नंबरवर एक संदेश येईल, ज्यामध्ये तुमचा मतदान क्रमांक आणि नाव लिहिले जाईल.
– जर तुमचे नाव मतदार यादीत नसेल तर तुम्हाला कोणतीही माहिती मिळणार नाही.
अशी अपडेट करा माहिती –
आता प्रश्न पडतो की तुमच्या तपशीलात काही चूक असेल तर ती कशी दुरुस्त करायची. निवडणूक आयोग तुम्हाला चूक सुधारण्यासाठी ऑनलाइन पर्याय देते. यासाठी तुम्हाला या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.
– सर्व प्रथम https://voters.eci.gov.in/ वर जा.
– येथे मुख्यपृष्ठावरच तुम्हाला Objection for proposed inclusion/deletion of name in existing roll (फॉर्म 7), Shifting of residence/correction of entries in existing electoral roll/replacement of EPIC/marking of PwD (फॉर्म 8) आढळतील.
– तुमच्या गरजेनुसार पर्याय निवडा आणि fill form वर क्लिक करा.
– आता तुम्हाला लॉगिन करण्यास सांगितले जाईल. जर तुम्ही पहिल्यांदा अर्ज करत असाल तर तुम्हाला आधी साइन अप करावे लागेल.
– साइन अप केल्यानंतर, तुमचा तपशील प्रविष्ट करा. तसेच करावयाच्या दुरुस्त्या लिहा.
– दुरुस्तीशी संबंधित कागदपत्रे संलग्न करा आणि सबमिट करा.