Womens Hockey Gold : भारतीय महिला हॉकी संघाचा ऐतिहासिक पराक्रम! चीनला नमवून तब्बल ४४ वर्षांनंतर जिंकलं सुवर्णपदक
Womens Hockey Gold : भारतीय महिला हॉकी संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे. अंतिम सामन्यात चीनला पराभूत करून, महिला संघाने ४४ वर्षांनंतर आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले.

Asian Games 2026 Womens Hockey India Beat China 1-0 Win Gold LA 2028 Qualified : जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) च्या मैदानातून भारतीय क्रीडाप्रेमींसाठी अत्यंत अभिमानास्पद बातमी समोर आली आहे. महिला हॉकीच्या अटीतटीच्या महाअंतिम फेरीत भारताने पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मधील रौप्यपदक विजेत्या चीनचा १-० असा रोमहर्षक पराभव करत ऐतिहासिक सुवर्णपदकावर (Gold Medal) आपले नाव कोरले आहे. तब्बल ४४ वर्षांनंतर (१९८२ नंतर पहिल्यांदाच) भारतीय महिला हॉकी संघाने आशियाडचे सुवर्ण जिंकून इतिहास घडवला आहे. चालू स्पर्धेतील भारताचे हे १६ वे सुवर्णपदक ठरले आहे.
लालरेमसियामीचा ऐतिहासिक २०० वा सामना अन् विजयी गोल!
सामन्याचा एकमेव आणि निर्णायक गोल भारताची स्टार फॉरवर्ड लालरेमसियामी हमारजोटे हिने पहिल्या क्वार्टरमध्ये १० व्या मिनिटाला डागला. २०१७ मध्ये पदार्पण करणाऱ्या लालरेमसियामीचा हा कारकिर्दीतील २०० वा आंतरराष्ट्रीय सामना होता. तिने आपल्या या मैलाच्या दगडावर सुवर्ण विजयाची मोहर उमटवली. २३ व्या मिनिटाला चीनला बरोबरी साधण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा पेनल्टी स्ट्रोक मिळाला होता, मात्र भारताची अनुभवी गोलकीपर सविता पुनियाने (Savita Punia) अफलातून बचाव करत गोलपोस्ट भेदण्याचा चीनचा मनसुबा उधळवून लावला.
चीनने गोलकीपरलाही बाहेर काढले; भारताचा अभेद्य बचाव!
𝗧𝗛𝗘 𝟰𝟰-𝗬𝗘𝗔𝗥 𝗪𝗔𝗜𝗧 𝗜𝗦 𝗢𝗩𝗘𝗥, 𝗧𝗛𝗘 𝗜𝗡𝗗𝗜𝗔𝗡 𝗪𝗢𝗠𝗘𝗡’𝗦 𝗧𝗘𝗔𝗠 𝗜𝗦 𝗔𝗦𝗜𝗔𝗡 𝗚𝗔𝗠𝗘𝗦 𝟮𝟬𝟮𝟲 𝗚𝗢𝗟𝗗 𝗠𝗘𝗗𝗔𝗟𝗟𝗜𝗦𝗧𝗦! 🇮🇳🥇
A 1-0 victory over World No. 4 China in the final seals a historic gold medal for the Indian Women’s Team, securing… pic.twitter.com/ZiQP1PSYaD
— Hockey India (@TheHockeyIndia) October 2, 2026
सामना बरोबरीत आणण्यासाठी अखेरच्या चार मिनिटांत चीनने आपल्या गोलकीपरला मैदानाबाहेर बसवून जादा स्ट्रायकरला मैदानात उतरवले. चीनचे सर्व ११ खेळाडू भारताच्या गोलपोस्टवर तुटून पडले होते. चीनला संपूर्ण सामन्यात ५ पेनल्टी कॉर्नर मिळाले, मात्र सविता पुनिया आणि भारतीय बचावफळीने एकही चेंडू गोलजाळ्यात जाऊ दिला नाही. भारताला सामन्यात केवळ एकच पेनल्टी कॉर्नर मिळाला, तरीही अचूक रणनीतीच्या जोरावर संघाने ही १-० अशी निसटती आघाडी शेवटपर्यंत टिकवून ठेवली.
लॉस एंजेलिस २०२८ ऑलिम्पिकचे थेट तिकीट पक्के!
The Golden Era of Women’s Hockey
Asian Champions, Olympic Qualification
The Indian women’s hockey team has won the gold medal after 44 years
Heartiest congratulations and best wishes 🇮🇳@PMOIndia @TheHockeyIndia #AsianGames2026 pic.twitter.com/2gR6P9i1WE— ओम प्रकाश माथुर (Om Prakash Mathur ) (@OmMathur_Raj) October 2, 2026
आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकावल्यामुळे भारतीय महिला हॉकी संघाने २०२८ मध्ये अमेरिकेतील लॉस एंजेलिस (LA 2028) येथे होणाऱ्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेसाठी थेट पात्रता (Qualification) मिळवली आहे. या विजयामुळे भारतीय क्रीडाविश्वात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.





