Yuzvendra Chahal Retirement : भारताच्या स्टार क्रिकेटपटूने अचानक जाहीर केली निवृत्ती, नेमकं कारण काय? जाणून घ्या
Yuzvendra Chahal Retirement : भारतीय क्रिकेटपटूने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर एका अत्यंत भावनिक पोस्टद्वारे निर्णयाची माहिती चाहत्यांना दिली

Yuzvendra Chahal Announces Retirement From First Class Cricket Focuses On White Ball : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फिरकीपटू युझवेंद्र चहलने (Yuzvendra Chahal) २ ऑक्टोबर रोजी क्रिकेटविश्वाला मोठा धक्का देत प्रथम श्रेणी (First-Class / Red-Ball) क्रिकेटमधून आपल्या निवृत्तीची अधिकृत घोषणा केली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर एका अत्यंत भावनिक पोस्टद्वारे चहलने या निर्णयाची माहिती चाहत्यांना दिली. लाल चेंडूच्या क्रिकेटमधून निवृत्त होत असला, तरी मर्यादित षटकांच्या (एकदिवसीय आणि टी-२०) क्रिकेटमध्ये खेळणे सुरूच ठेवणार असल्याचे त्याने स्पष्ट केले आहे.
“लॉर्ड्सवर खेळला अखेरचा सामना; टेस्ट कॅपचे स्वप्न अपूर्ण राहिले!”
इन्स्टाग्रामवरील आपल्या भावनिक पोस्टमध्ये चहलने लिहिले की, “वयाच्या १० व्या वर्षी हातात धरलेला पहिला चेंडू लाल रंगाचा होता. रेड-बॉल क्रिकेटने मला संयम, चिकाटी आणि तासन्तास मैदानावर घाम गाळण्याचे महत्त्व शिकवले. भारताची कसोटी कॅप (Test Cap) मिळवणे हे माझे अनेक वर्षांचे स्वप्न होते; ते पूर्ण होऊ शकले नाही, तरीही मी माझ्या या प्रवासावर समाधानी आहे. मी माझा अखेरचा प्रथम श्रेणी सामना ऐतिहासिक लॉर्ड्सच्या मैदानावर नॉर्थम्प्टनशायरकडून खेळलो.”
पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटवर लक्ष केंद्रित; टीम इंडियात पुनरागमनाचा निर्धार!
Yuzvendra Chahal has announced his retirement from red-ball cricket. Across 49 first-class appearances, he claimed 148 wickets and compiled 451 runs. 🏏
Congratulations, Yuzi, and good luck in the white-ball formats. ⚪ @yuzi_chahal pic.twitter.com/hbiqGhYplD
— Circle of Cricket (@circleofcricket) October 2, 2026
चहलने भारतीय संघासाठी आजवर केवळ एकदिवसीय आणि टी-२० क्रिकेटमध्येच प्रतिनिधित्व केले असून, प्रदीर्घ काळापासून तो राष्ट्रीय संघातून बाहेर आहे. मात्र, क्रिकेटचा अध्याय संपलेला नाही हे सांगताना चहल म्हणाला, “माझ्यात अजूनही भरपूर क्रिकेट शिल्लक आहे. भारताच्या वनडे आणि टी-२० संघात पुन्हा एकदा स्थान मिळवण्यासाठी मी माझी सर्व ताकद पणाला लावीन.”
हरियाणा क्रिकेट असोसिएशनचे मानले आभार!
A wizard with a red ball in hand 🪄
Yuzi Chahal has announced his retirement from first-class cricket.
Congratulations on a wonderful first-class career and thank you for everything ❤️ pic.twitter.com/R32JGNgpkm
— Northamptonshire CCC (@NorthantsCCC) October 2, 2026
आपल्या प्रदीर्घ प्रथम श्रेणी प्रवासात मोलाची साथ दिल्याबद्दल चहलने हरियाणा क्रिकेट असोसिएशन, रणबीर सिंह महिंद्रा सर आणि अनिरुद्ध सिंह चौधरी सर यांचे विशेष आभार मानले. इंग्लंडमधील काउंटी क्रिकेट गाजवणारा चहल आता आयपीएल आणि मर्यादित षटकांच्या स्पर्धांमध्ये आपले संपूर्ण लक्ष केंद्रित करणार आहे.





