Ankush Panghal Gold : आशियाडमध्ये भारतीय बॉक्सरांनी रचला इतिहास! ‘गोल्डन पंच’च्या हॅट्ट्रिकसह ६ पदकावर कोरलं नाव
Ankush Panghal Gold : आशियाई क्रीडा स्पर्धेच्या तेराव्या दिवशी भारतीय बॉक्सरनी उत्कृष्ट कामगिरी करत तीन सुवर्ण आणि तीन कांस्य पदके जिंकली.

Asian Games 2026 Boxing Ankush Panghal Wins Gold India Clinches 6 Medals : जपानमधील आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) च्या १३ व्या दिवशी भारतीय बॉक्सिंग पथकाने आपली मोहीम ‘गोल्डन’ अंदाजात पूर्ण केली आहे. आज २ ऑक्टोबर रोजी पुरुषांच्या ८० किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत भारताचा युवा बॉक्सर अंकुश पंघालने (Ankush Panghal) दक्षिण कोरियाच्या किम मिनसियोंगचा ४-० असा एकतर्फी धुव्वा उडवत ऐतिहासिक सुवर्णपदक (Gold Medal) पटकावले. या विजयामुळे भारतीय बॉक्सिंग संघाने स्पर्धेत ३ सुवर्ण आणि ३ कांस्य अशी एकूण ६ पदके जिंकून इतिहास रचला आहे.
८ वर्षांनंतर पुरुषांच्या बॉक्सिंगमध्ये सुवर्ण; अमित पंघालनंतर पराक्रम!
अंकुश पंघालने मिळवलेले हे सुवर्णपदक भारतीय पुरुष बॉक्सिंगसाठी अत्यंत ऐतिहासिक ठरले आहे. २०१८ च्या जकार्ता आशियाडमध्ये अमित पंघालने सुवर्ण जिंकल्यानंतर, तब्बल ८ वर्षांनंतर आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा अंकुश हा पहिलाच भारतीय पुरुष बॉक्सर ठरला आहे. याआधी २०२६ च्या कॉमनवेल्थ गेम्समध्येही त्याने जबरदस्त कामगिरी करत सुवर्णपदकाला गवसणी घातली होती.
लव्हलिना, परवीन आणि अंकुशचे सुवर्ण; भारत पाचव्या स्थानावर!
GOLDEN PUNCH! 🥇🇮🇳🔥
Asian Games 2026 | Boxing
Men’s 80kg – Gold Medal MatchAnkush defeats Kim Minseong of the Republic of Korea 4–0 via split decision to clinch 🥇 GOLD!
India finishes its boxing campaign with 6️⃣ medals:
🥇 3 Gold | 🥉 3 BronzeA GOLDEN finish for Team… pic.twitter.com/gr6eM8b6AK
— SAI Media (@Media_SAI) October 2, 2026
नागोयाच्या निशिओ जिम्नॅशियममध्ये रंगलेल्या अंतिम फेरीत अंकुशच्या आधी महिला गटात लव्हलिना बोरगोहेन आणि परवीन हुड्डा यांनीही सुवर्णपदके जिंकून रिंग गाजवली. आशियाई क्रीडा स्पर्धेच्या इतिहासातील भारतीय बॉक्सिंग संघाची ही आतापर्यंतची सर्वात सर्वोत्तम सुवर्ण कामगिरी ठरली आहे. बॉक्सिंगमधील या दमदार पदकांमुळे भारताने थेट पदक तालिकेत ५ व्या क्रमांकावर झेप घेतली आहे.
शेतकरी कुटुंबात जन्म, कबड्डी सोडून हातात चढवले ग्लोव्ह्ज!
SHE FOUGHT. SHE ROARED. SHE CONQUERED! 🥊🔥🇮🇳
Parveen stands tall on the Asian Games podium with a GOLD! 🥇
She edges past Chen Nien-chin of Chinese Taipei 3–2 in a thrilling split decision to claim India’s 2nd Boxing GOLD at #AsianGames2026.
A historic triumph in the new 65kg… pic.twitter.com/DcMQMyBT9U
— SAI Media (@Media_SAI) October 2, 2026
अंकुश हा हरियाणातील हिस्सार जिल्ह्यातील एका शेतकरी कुटुंबातील आहे. १३ ऑगस्ट २००५ रोजी जन्मलेल्या अंकुशचे वडील कबड्डीपटू होते आणि सुरुवातीला अंकुशनेही जिल्हा स्तरावर कबड्डीत सुवर्णपदक पटकावले होते. मात्र, वडिलांच्या आग्रहाखातर त्याने बॉक्सिंगची वाट धरली आणि आज त्याच बळावर संपूर्ण आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचा तिरंगा डौलाने फडकवला.





