Vaibhav Sooryavanshi Record : वैभव सूर्यवंशीने आशिया क्रीडा स्पर्धेत रचला इतिहास! ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पहिलाच खेळाडू
Vaibhav Sooryavanshi Record : भारताचा युवा क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशीने आशिया क्रीडा २०२६ मध्ये एका मोठ्या महाविक्रमाला गवसणी घातली आहे,

Asian Games 2026 Vaibhav Sooryavanshi Youngest Indian Athlete To Win Gold Record : आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) च्या पुरुष क्रिकेटच्या अंतिम सामन्यात भारताने पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा १९ धावांनी धुव्वा उडवत सलग दुसरे सुवर्णपदक पटकावले. भारताच्या या सुवर्ण विजयासोबतच भारताचा युवा क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशीने (Vaibhav Sooryavanshi) अशा एका महाविक्रमाला गवसणी घातली आहे, जी आजवर भारताच्या एकाही ॲथलीटला करता आलेली नाही. आशियाई क्रीडा स्पर्धेच्या संपूर्ण इतिहासात सुवर्णपदक जिंकणारा वैभव हा सर्वात तरुण भारतीय खेळाडू ठरला आहे.
सौरभ चौधरीचा ८ वर्षे जुना विक्रम इतिहासजमा!
वैभवने हे सुवर्णपदक जिंकले तेव्हा त्याचे वय अवघे १५ वर्षे, ६ महिने आणि १० दिवस इतके होते. यासह त्याने भारताचा स्टार नेमबाज सौरभ चौधरीचा तब्बल आठ वर्षे जुना विक्रम मोडीत काढला. सौरभ चौधरीने २०१८ च्या जकार्ता आशियाई क्रीडा स्पर्धेत वयाच्या १६ व्या वर्षी १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदक पटकावून हा विक्रम नोंदवला होता.
आशियाडच्या इतिहासातील दुसरा सर्वात तरुण पदक विजेता!
At just 15, Vaibhav Sooryavanshi has already entered the Asian Games record books!
India’s cricket prodigy became the country’s youngest-ever Asian Games gold medallist after the men’s team defeated Pakistan by 19 runs in the final. He surpasses shooter Saurabh Chaudhary, who… pic.twitter.com/nB9qgRBUD0
— News18 (@CNNnews18) October 3, 2026
सुवर्णपदक विजेत्यांमध्ये वैभव अव्वल स्थानी पोहोचला असला, तरी एकंदरीत पदक विजेत्यांच्या यादीत तो भारताचा दुसरा सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे. हा विक्रम स्पीड स्केटर संजना बाथुलाच्या नावावर असून, तिने २०२३ च्या हांगझोऊ आशियाडमध्ये महिलांच्या ३००० मीटर रिलेत वयाच्या अवघ्या १५ वर्षे, ३ महिने आणि ११ दिवस असताना कांस्यपदक जिंकले होते.
सैम अयूबचे ‘बेबी सेलिब्रेशन’; सुवर्ण जिंकून भारताने दिले उत्तर!
Vaibhav Sooryavanshi is now the youngest Indian to win an Asian Games gold 🥇
At 15 years, six months and six days, the Rajasthan Royals star helped India retain the men’s cricket title with a 19-run win over Pakistan in the final.
He breaks shooter Saurabh Chaudhary’s record… pic.twitter.com/cQzipOyY0u
— The Bridge (@the_bridge_in) October 3, 2026
पाकिस्तानविरुद्धच्या अंतिम सामन्यात वैभवने डावाची आक्रमक सुरुवात करत ९ चेंडूंत १५ धावा फटकावल्या. मात्र, तिसऱ्या षटकात पाकिस्तानच्या सैम अयूबने त्याला बाद केले. बाद केल्यानंतर अयूबने केलेल्या ‘बेबी सेलिब्रेशन’ने सर्वांचे लक्ष वेधले होते. मात्र, भारतीय संघाने शेवटी सुवर्णपदक जिंकून अयूबच्या त्या डिवचण्याला मैदानावर चोख प्रत्युत्तर दिले.
भारतीय क्रीडाविश्वाच्या इतिहासात कोरले नाव!
The 𝙛𝙞𝙧𝙨𝙩 𝙩𝙞𝙢𝙚 𝙬𝙖𝙨 𝙨𝙤 𝙣𝙞𝙘𝙚…you know the rest! 😌#TeamIndia with back-to-back Gold Medals in both the women’s and men’s events 🥇🫡#AsianGames pic.twitter.com/57RQ22LP4M
— BCCI (@BCCI) October 3, 2026
अत्यंत कमी वयात आंतरराष्ट्रीय मंचावर भारताचे प्रतिनिधित्व करताना सुवर्णपदक गळ्यात घालणारा वैभव सूर्यवंशी हा आता केवळ क्रिकेटपुरता मर्यादित न राहता, संपूर्ण भारतीय ऑलिम्पिक आणि आशियाई क्रीडा चळवळीचा नवा चेहरा बनला आहे.





