Esha Singh Silver : अवघ्या एका शॉटने हुकले सुवर्णपदक! तब्बल ५ शूट-ऑफचा थरार जिंकत ईशा सिंगने पटकावलं ऐतिहासिक रौप्यपदक
Esha Singh Silver : महिलांच्या २५ मीटर पिस्तूल प्रकारात ईशा सिंगने रौप्यपदक मिळवून दिलं आहे.

Asian Games 2026 Esha Singh Wins Silver 25m Pistol Shoot Off Thriller : जपानमधील क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताची युवा नेमबाज ईशा सिंगने (Esha Singh) महिलांच्या २५ मीटर पिस्तूल प्रकारात अंगावर काटा आणणारा थरार अनुभवत रौप्यपदक (Silver Medal) पटकावलं. अंतिम फेरीत ईशाने अखेरच्या क्षणापर्यंत कडवी झुंज दिली; मात्र अवघ्या एका शॉटच्या फरकाने तिचं सुवर्णपदक हुकलं. ईशाने एकूण ३८ गुणांसह चीनच्या जियारुईशुआन शियाओची बरोबरी साधली होती. परंतु, निर्णायक शूट-ऑफमध्ये चिनी खेळाडूने बाजी मारल्याने ईशाला रौप्यपदकावर समाधान मानावं लागलं.
मनू-राही बाहेर; ईशाने एकटीने लढवली भारताची खिंड!
पात्रता फेरीत स्टार नेमबाज मनू भाकर आणि अनुभवी राही सरनोबत यांना अपयश आल्यानंतर भारताच्या आशा केवळ २१ वर्षीय ईशावर टिकून होत्या. एका टप्प्यावर ती चौथ्या स्थानावर घसरल्याने पदकही धोक्यात आलं होतं. मात्र, दबावाखाली जबरदस्त संयम दाखवत तिनं सलग ५ पैकी ५ अचूक निशाणे साधत भारताचे पदक पक्क केलं.
उत्तर कोरियाविरुद्ध सलग तीन टायब्रेकर; ईशाने दाखवली मानसिक ताकद!
Heartiest congratulations to Esha Singh on winning the Silver Medal in the Women’s 25m Pistol Individual event at the #AsianGames2026!
Her exceptional focus, steady hand, and composure under pressure on the global stage have brought immense pride to the nation.
Keep aiming high… pic.twitter.com/b6GQYTeLGo
— Naveen Jindal (@MPNaveenJindal) September 28, 2026
रौप्यपदकाच्या लढतीत उत्तर कोरियाच्या किम ह्यॉन सुकविरुद्ध ३४-३४ अशी बरोबरी झाली. त्यानंतर झालेल्या पहिल्या दोन शूट-ऑफमध्येही दोघींनी ३-३ गुण मिळवले. अखेर अधिकाऱ्यांच्या वारंवार अडथळ्यानंतरही तिसऱ्या शूट-ऑफमध्ये ईशाने ३-२ अशी बाजी मारत थेट सुवर्णपदकाच्या लढतीत धडक मारली.
तब्बल ५ शूट-ऑफ पार; चीनच्या खेळाडूशी ३८ गुणांची बरोबरी!
SILVER FOR ESHA SINGH! 🚨🥈
Esha Singh puts on a shooting clinic to claim SILVER at the 20th Asian Games Aichi-Nagoya 2026! 👏
Watch the 20th Asian Games Aichi-Nagoya 2026, LIVE on Sony Sports Network TV channels & Sony LIV.#SonySportsNetwork #SonyLIV #AsianGames… pic.twitter.com/x9veRje3HU
— Sony Sports Network (@SonySportsNetwk) September 28, 2026
हैदराबादच्या या युवा नेमबाजानं संपूर्ण सामन्यात तब्बल ५ थरारक शूट-ऑफ यशस्वीरीत्या पार केले. अखेर सहाव्या टायब्रेकमध्ये चीनच्या शियाओ जियारुईशुआनने अचूक निशाणा साधत सुवर्णपदक खिशात घातलं. अटीतटीच्या संघर्षात भारताचे सुवर्ण हुकलं असलं तरी ईशाच्या या लढवय्या वृत्तीचे देशभरातून कौतुक होत आहे.





