Roshibina Devi Wushu : रोशिबिना देवीचा ऐतिहासिक पराक्रम! मकाऊच्या खेळाडूला लोळवून उपांत्य फेरीत धडक; सलग तिसरे पदक केले पक्के
Roshibina Devi Wushu : रोशिबिना देवी नोरमने मंगळवारी महिलांच्या ६० किलो वुशू प्रकाराl उपांत्य फेरी गाठून आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचे पदक निश्चित केले.

Asian Games 2026 Roshibina Devi Assures Third Consecutive Medal Enters Wushu Semifinal : जपानमधील नागोया येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताची स्टार वूशू खेळाडू नाओरेम रोशिबिना देवीने (Roshibina Devi) आपला दबदबा कायम राखत इतिहास रचला आहे. महिलांच्या ६० किलो सांडा (Sanda) वजनी गटाच्या उपांत्यपूर्व फेरीत तिने मकाऊच्या चू मॅन सिनचा ५-० असा एकतर्फी धुव्वा उडवला. या दणदणीत विजयासोबतच रोशिबिनाने उपांत्य फेरीत प्रवेश करून भारताचे आणखी एक पदक निश्चित केले असून, आशियाई क्रीडा स्पर्धेत सलग तिसरे वैयक्तिक पदक जिंकणारी ती पहिली भारतीय वूशू खेळाडू ठरली आहे.
पाच गुणांच्या फरकाने विजय; आता रोशिबिनाची सुवर्णपदकावर नजर!
रोशिबिनाने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करत मकाऊच्या खेळाडूवर निर्विवाद नियंत्रण मिळवले आणि ५-० ने सामना जिंकला. याआधी तिने उप-उपांत्यपूर्व फेरीत बांगलादेशच्या शिखा खातूनला पराभूत केले होते. रोशिबिनाने २०१८ च्या जकार्ता आशियाई स्पर्धेत कांस्य, तर २०२२ च्या हांगझोऊ स्पर्धेत रौप्यपदक जिंकले होते. आता सलग तिसऱ्या स्पर्धेत पदक पक्के केल्यानंतर तिचे संपूर्ण लक्ष बुधवार, २३ सप्टेंबर रोजी होणाऱ्या उपांत्य फेरीत विजय मिळवून सुवर्णपदकावर (Gold Medal) नाव कोरण्यावर केंद्रित आहे.
पुरुष गटात आर्यन क्वार्टर फायनलमध्ये; पदकापासून अवघा एक पाऊल दूर!
STORY | Roshibina Devi enters semifinals in wushu at Asian Games, ensures medal
Roshibina Devi Naorem on Tuesday assured India of a medal as she entered the semifinals of the women’s 60kg category in wushu, defeating Chu Man Sin from Macau in the last eight stage at the Asian… pic.twitter.com/xwf9Mym9gw
— Press Trust of India (@PTI_News) September 22, 2026
रोशिबिनाशिवाय पुरुष गटात भारताच्या आर्यनने चमकदार कामगिरी करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवला आहे. पुरुषांच्या ५६ किलो वजनी गटात त्याने अफगाणिस्तानच्या साफी शहजादाचा २-० असा सरळ सेटमध्ये पराभव केला. आर्यन आता पदकाची खात्री करण्यासाठी उपांत्यपूर्व लढतीत मैदानात उतरेल.
इतर भारतीय वूशू खेळाडूंचे प्रयत्न; सूरजचे पदक थोडक्यात हुकले!
🥉 𝐢𝐧 𝟐𝟎𝟏𝟖
🥈 𝐢𝐧 𝟐𝟎𝟐𝟑
🏅 𝐚𝐬𝐬𝐮𝐫𝐞𝐝 𝐢𝐧 𝟐𝟎𝟐𝟔Assured of a medal at the Asian Games for the third consecutive edition.
Roshibina Devi beat Macau’s Man Sin Chu in the women’s 60kg wushu quarterfinal at the Asian Games 2026.
She was a last-minute replacement… pic.twitter.com/9kLOUwai0x
— Sportstar (@sportstarweb) September 22, 2026
महिलांच्या नानक्वान आणि नंदाओ फायनलमध्ये भारताची हंजाबम लँगलेनटोम्बी देवी १८.८३९ गुणांसह नवव्या स्थानी राहिली, तर न्येमन वांगसू चांगक्वान प्रकारात १५व्या स्थानी राहिली. पुरुषांच्या चांगक्वान प्रकारात सूरज सिंह मयांगलामबम ९.६८३ गुणांसह ११व्या स्थानी राहिला; मात्र अवघ्या ०.०४० गुणांच्या फरकाने त्याचे कांस्यपदक हुकले.





