Kamaljeet Suruchi Gold : महिला क्रिकेटनंतर आता शूटिंगमध्ये भारताचा डंका; दक्षिण कोरियाला धूळ चारत जिंकलं दुसरं गोल्ड!
Kamaljeet Suruchi Gold : अंतिम स्पर्धेत कमलजीत आणि सुरुची यांनी ४८४.६ गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला, तर दक्षिण कोरियाच्या संघाने दुसरे स्थान मिळवले.

Kamaljeet and Suruchi win Gold Medal 10m Air Pistol Mixed Team event in Asian Games 2026 : एशियन गेम्स 2026 मध्ये भारतासाठी 25 सप्टेंबरची सकाळ ऐतिहासिक ठरली. नेमबाजीत कमलजीत आणि सुरुची या जोडीने 10 मीटर एअर पिस्टल मिक्स्ड टीम प्रकारात सुवर्णपदक पटकावले. महिला क्रिकेट संघानंतर भारताचे या स्पर्धेतील हे दुसरे सुवर्णपदक ठरले. पात्रता फेरीत अव्वल स्थान मिळवणाऱ्या या भारतीय जोडीने अंतिम फेरीत सुरुवातीपासून शेवटपर्यंत वर्चस्व राखले आणि 484.6 गुणांची नोंद करत सुवर्णावर नाव कोरले. विशेष म्हणजे, अवघ्या 3.8 गुणांच्या फरकाने त्यांचा नवा जागतिक विक्रम हुकला.
दक्षिण कोरियाचे तगडे आव्हान परतवले –
मेडल फेरीत भारत, दक्षिण कोरिया, इराण आणि इंडोनेशिया यांच्यात चुरस रंगली होती. भारताने पहिल्या फेरीपासूनच आघाडी घेतली होती, परंतु दक्षिण कोरियाच्या सुह्योन होंग आणि गाउन चू या जोडीने अखेरपर्यंत कडवी लढत दिली. शेवटी दक्षिण कोरियाला 478 गुणांसह रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. इराणच्या जोडीने 415.8 गुणांसह कांस्यपदक मिळवले, तर इंडोनेशियाचा संघ 349.4 गुणांसह चौथ्या स्थानी राहिला.
50 मीटर रायफल प्रकारात पुरुषांना रौप्यपदक –
GOLD, WITH A RECORD TO MATCH! 🥇
Suruchi Singh and Kamaljeet seal the gold for India with a new Asian Record of 484.6! 🤩
Watch the 20th Asian Games Aichi-Nagoya 2026 on Sony Sports Network TV channels & Sony LIV.#SonySportsNetwork #SonyLIV #AsianGames #AichiNagoya2026… pic.twitter.com/lvEtHemMAO
— Sony Sports Network (@SonySportsNetwk) September 25, 2026
पुरुषांच्या 50 मीटर रायफल 3 पोझिशन सांघिक प्रकारातही भारताने दमदार कामगिरी करत रौप्यपदक आपल्या नावावर केले. ऐश्वर्य प्रताप सिंह तोमर (589 गुण), नीरज कुमार (588 गुण) आणि रुद्राक्ष पाटील (585 गुण) यांनी अचूक निशाणा साधत सांघिक स्तरावर 1762 गुणांची कमाई केली. या अत्यंत चुरशीच्या सामन्यात अवघ्या चार गुणांच्या फरकाने भारताचे सुवर्ण हुकले. चीनच्या संघाने 1766 गुणांसह सुवर्णपदक जिंकले.
हेही वाचा – IND A vs AUS A : भारताचा ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय, १६८ धावांनी उडवला कांगारूंचा धुव्वा
पदक तालिकेत भारत 12 व्या स्थानी –
INDIAN NATIONAL ANTHEM IN JAPAN 🇮🇳🥹
– Suruchi & Kamalpreet wins 2nd Gold for India at the Asian Games 2026! 🥇 pic.twitter.com/hYDw1R2MuS
— The Khel India (@TheKhelIndia) September 25, 2026
या दुहेरी यशासह एशियन गेम्समधील भारताच्या एकूण पदकांची संख्या आता 18 वर पोहोचली आहे. यामध्ये 2 सुवर्ण, 8 रौप्य आणि 8 कांस्यपदकांचा समावेश असून, भारत आता पदक तालिकेत 12 व्या स्थानावर पोहोचला आहे. नेमबाजीतील या सातत्यपूर्ण यशामुळे आगामी दिवसांत भारतीय खेळाडूंकडून आणखी पदकांची आणि सुवर्ण कामगिरीची अपेक्षा उंचावली आहे.





