Jay Meena Bronze : जय मीनाची आशियाई स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी! सॉफ्ट टेनिसमध्ये भारताला मिळवून दिलं पहिलंवहिलं पदक
Jay Meena Bronze : जय मीनाने २०२६ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सॉफ्ट टेनिसमध्ये ऐतिहासिक कांस्य पदक जिंकून इतिहास रचला आहे. या खेळातील भारताचे हे पहिले आशियाई क्रीडा पदक आहे.

Asian Games 2026 Jay Meena Wins Historic Bronze First Ever Medal In Soft Tennis : जपानमधील नागोया येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताचा स्टार खेळाडू जय मीणाने (Jay Meena) सॉफ्ट टेनिसच्या कोर्टवर इतिहास रचला आहे. पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत जपानच्या ताकुया कुरोसाकाविरुद्ध २-४ असा पराभव पत्करावा लागला असला, तरी जयने कांस्यपदक (Bronze Medal) पटकावले आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेच्या इतिहासात सॉफ्ट टेनिस या खेळात पदक जिंकणारा जय मीणा हा भारताचा पहिलावहिला खेळाडू ठरला आहे.
क्वार्टर फायनलमध्ये झुंजार पुनरागमन; सलग चार गुण घेत पदक केले पक्के!
जयने उपांत्यपूर्व फेरीत शेरविन नुगुईटविरुद्ध स्वप्नवत पुनरागमन करत भारताचे पदक निश्चित केले होते. निर्णायक गेममध्ये ३-५ ने पिछाडीवर असताना जयने हार न मानता सलग चार गुण वसूल केले आणि सामना ४-३ असा खिशात घालत उपांत्य फेरीत धडक मारली होती. त्यानंतर उपांत्य फेरीत स्थानिक जपानी खेळाडूविरुद्ध कडवी झुंज देत त्याचे ऐतिहासिक कांस्यपदकावर शिक्कामोर्तब झाले.
क्रिकेटचे स्वप्न ते बॉल बॉय; देवासमधून सुरू झाला सुवर्ण प्रवास!
Through the pain, through the pressure, Jay Meena battles his way to India’s first-ever Asian Games medal in Soft Tennis! 👏
Watch the 20th Asian Games Aichi-Nagoya 2026 on Sony Sports Network TV channels & Sony LIV.#SonySportsNetwork #SonyLIV #AsianGames #AichiNagoya2026… pic.twitter.com/TgPqpfSxvJ
— Sony Sports Network (@SonySportsNetwk) September 23, 2026
जय मीणाचा इथपर्यंतचा प्रवास अत्यंत रंजक आणि प्रेरणादायी आहे. सुरुवातीला त्याला क्रिकेटपटू व्हायचे होते; मात्र मध्य प्रदेशातील देवास येथील पायोनियर पब्लिक स्कूलमध्ये प्रवेश घेतल्यानंतर तेथील सॉफ्ट टेनिस कोर्टने त्याचे लक्ष वेधले. सुरुवातीला तो खेळाडूंना खेळताना पाहायचा आणि कोर्टवर बॉल बॉय म्हणून मदत करायचा. हळूहळू या खेळातील आवड वाढली आणि अवघ्या १४ व्या वर्षी त्याने जपानमध्ये आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले.
राष्ट्रीय सुवर्ण ते थेट जागतिक पदक; जयची ऐतिहासिक कामगिरी!
Another medal. Another first.
Heartiest congratulations to Jay Meena on winning the Bronze Medal in the Men’s Singles Soft Tennis event at #AsianGames2026.
This is India’s first ever Asian Games medal for India in Men’s Singles Soft Tennis. A proud moment and a remarkable… pic.twitter.com/vFmgyDbtRK— Hardeep Singh Puri (@HardeepSPuri) September 23, 2026
२०२२ च्या गुजरात राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत एकेरीचे सुवर्ण पटकावून जयने सर्वांचे लक्ष वेधले होते. त्यानंतर २०२४ च्या वर्ल्ड सॉफ्ट टेनिस चॅम्पियनशिपमध्ये त्याने आध्या तिवारीसह मिश्र दुहेरीत भारताला पहिले कांस्यपदक मिळवून दिले. २०२५ मध्ये आशियाई सॉफ्ट टेनिस चॅम्पियनशिपमध्ये त्याने एकेरीच्या कांस्यसह एकूण ४ पदके जिंकली होती. आता आशियाडमध्ये पहिले पदक जिंकून त्याने भारतीय क्रीडाविश्वात नवा अध्याय लिहिला आहे.





