Womens Skeet Bronze : भारतीय महिला नेमबाज संघाने कांस्यपदकावर साधला निशाणा! भारताला स्कीट प्रकारात मिळवून दिलं पदक
Womens Skeet Bronze : महिलांच्या स्किट शूटिंग स्पर्धेत भारताने आणखी एक कांस्य पदक जिंकले, जिथे रझिया ढिल्लन, महेश्वरी चौहान आणि परिनाझ धालीवाल या त्रिकुटाने उत्कृष्ट कामगिरी केली.

Asian Games 2026 India Womens Skeet Team Wins Bronze Medal Raiza Maheshwari Parinaaz : जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारतीय नेमबाजांचा सुवर्णकाळ सुरूच आहे. महिलांच्या स्कीट सांघिक (Skeet Team) प्रकारात भारताच्या रायझा धिल्लन, माहेश्वरी चौहान आणि पारिनाज धालीवाल या त्रिकुटाने चमकदार कामगिरी करत कांस्यपदक (Bronze Medal) पटकावले आहे. या पदकासह भारताच्या खात्यात आता एकूण ८ पदके जमा झाली आहेत. विशेष म्हणजे, भारताला मिळालेल्या एकूण आठ पदकांपैकी तब्बल ६ पदके एकट्या नेमबाजांनी जिंकून दिली आहेत.
३३१ गुणांची एकत्रित कमाई; चीनला सुवर्ण तर कझाकस्तानला रौप्य!
भारतीय त्रिकुटाने अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या अंतिम लढतीत मिळून ३३१ गुणांची लढाऊ नोंद केली. यामध्ये पारिनाज धालीवाल आणि रायझा धिल्लन यांनी प्रत्येकी १११-१११ गुण मिळवले, तर अनुभवी माहेश्वरी चौहानने १०९ गुणांचे योगदान देत भारताचे पदक पक्के केले. या स्पर्धेत चीनच्या संघाने ३५७ गुणांसह सुवर्णपदक पटकावले, तर कझाकस्तानच्या संघाने ३३७ गुणांची कमाई करत रौप्यपदकावर आपले नाव कोरले.
पारिनाज आणि रायझा वैयक्तिक फायनलमध्ये; या नियमाचा झाला फायदा!
Bronze for Women’s Skeet team 🤩🥉
The trio of Maheshwari Chauhan, Raiza Dhillon and Parinaaz Dhaliwal secure India its EIGHT medal 🏅#ISH #BlueRising #AsianGames pic.twitter.com/lPc75wHCX8— Indian Sports Honours (@sportshonours) September 23, 2026
सांघिक पदकासोबतच पारिनाज आणि रायझा यांनी महिला स्कीटच्या वैयक्तिक अंतिम फेरीतही धडक मारली आहे. नियमानुसार अव्वल ८ नेमबाजांना वैयक्तिक फायनलमध्ये प्रवेश मिळतो. पारिनाज आठव्या स्थानी राहून थेट पात्र ठरली; तर रायझा नवव्या स्थानी असूनही तिला फायनलचे तिकीट मिळाले. एका देशाचे केवळ दोनच खेळाडू अंतिम फेरीत खेळू शकतात हा नियम भारताच्या पथ्यावर पडला. चीनच्या तीन खेळाडू अव्वल ८ मध्ये असल्याने नियमानुसार रायझाला अंतिम फेरीत खेळण्याची ऐतिहासिक संधी मिळाली.
नेमबाजीत भारताचा दबदबा कायम!
भारताने या स्पर्धेत यापूर्वी महिला आणि पुरुष १० मीटर एअर रायफल सांघिक व वैयक्तिक प्रकारांत रौप्यपदके जिंकली होती, तर एका वैयक्तिक प्रकारात कांस्यपदकही मिळवले होते. आता स्कीट प्रकारातील या शानदार कांस्यपदकामुळे नागोयाच्या नेमबाजी रेंजवर भारताचा तिरंगा सातत्याने फडकत असून क्रीडाप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.





