Asian Games 2023 (Badminton Men’s Singles) : एचएस प्रणॉयची आगेकूच; पदकही केले निश्चित…

Asian Games 2023 (Badminton Men’s Singles) : आशियाई क्रीडा स्पर्धेतील पुरुष एकेरीत भारताचा अव्वल बॅडमिंटनपटू एचएस प्रणॉय याने मलेशियाच्या ली जी जियाचा सरळ गेममध्ये पराभव करून उपांत्य फेरीत स्थान निश्चित केले आहे. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या गेम्समध्ये बॅडमिंटनमधील भारताचे दुसरे पदकही निश्चित झाले आहे.गेल्या रविवारी पुरुषांच्या सांघिक चॅम्पियनशिपमध्ये भारताने रौप्यपदक पटकावले होते.
एचएस प्रणॉय याने उपांत्यपूर्व फेरीत मलेशियाच्या ली जी जियावर 21-16, 21-23, 22-20 असा विजय मिळवला. हा सामना 78 मिनिटे चालला.
🏸🇮🇳BADMINTON BRILLIANCE🏸#TOPSchemeAthlete @PRANNOYHSPRI delivered an absolutely nail-biting performance in the Men's Singles Quarterfinal, defeating LZ Jia (MAS) with a thrilling score of 21-16, 21-23, 22-20! 🇮🇳💥
He has assured us a medal for 🇮🇳 🤩
Let's #Cheer4India!… pic.twitter.com/K5OfnKdGdg
— SAI Media (@Media_SAI) October 5, 2023
दरम्यान, नवी दिल्ली 1982 मध्ये सय्यद मोदीच्या कांस्यपदकानंतर प्रणॉयचे पदक हे आशियाई क्रीडा स्पर्धेतील पुरुष एकेरीत भारताचे पहिले पदक आहे. जागतिक चॅम्पियनशिपचा कांस्यपदक विजेता प्रणॉय पाठीच्या दुखापतीमुळे चीनविरुद्धच्या सांघिक चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात खेळू शकला नाही. या सामन्यात 2-3 असा पराभव पत्करावा लागल्याने भारताला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले होते.
यापूर्वी, आशियाई क्रीडा 2023 स्पर्धेत भारताची दोनवेळची ऑलिम्पिकपदक विजेती महिला बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिला महिलांच्या एकेरीत उपांत्यपूर्व फेरीतच पराभवाचा धक्का बसला. जागतिक क्रमवारीत 15व्या स्थानी असलेल्या पीव्ही सिंधूला जागतिक क्रमवारीत पाचव्या क्रमांकावर असलेल्या आणि यजमान चीनच्या हे बिंजियाओ हीच्याकडून 21-16, 21-12 असा अवघ्या 47 मिनिटांत पराभव पत्करावा लागला. या पराभवामुळे सिंधूचे या स्पर्धेतील आव्हान संपूष्टात आले आहे.





