Asian Olympic Qualifiers Shooting 2024 : विजयवीर सिद्धूने शनिवारी(दि.13) जकार्ता, इंडोनेशिया येथे आशियाई ऑलिम्पिक पात्रता रायफल आणि पिस्तूल स्पर्धेत पुरुषांच्या 25 मीटर रॅपिड फायर पिस्तूल प्रकारामध्ये भारतासाठी पॅरिस 2024 ऑलिंपिक कोटा मिळवला.
2024 पॅरिस ऑलिम्पिकसाठी हा भारताचा नेमबाजीतील 17 वा आणि पुरुषांच्या 25 मीटर रॅपिड फायर पिस्तूल प्रकारातील दुसरा कोटा होता. त्याआधी अनिश भानवालाने गतवर्षी कोरियातील चँगवॉन येथे झालेल्या आशियाई चॅम्पियनशिप 2023 मध्ये कांस्यपदकासह ऑलिम्पिक कोटा मिळवला होता. गेल्या वर्षी झालेल्या हँगझोऊ आशियाई क्रीडा स्पर्धेतील सांघिक कांस्यपदक विजेता 21 वर्षीय विजयवीर याला कोटा मिळविण्यासाठी पदकाची प्रतीक्षा करावी लागली नाही. त्याने 577 गुणांसह चौथ्या स्थानावरून अंतिम फेरीसाठी पात्रता मिळवून कोटा मिळवला होता.
Many congratulations to Vijayveer Sidhu for clinching SILVER 🥈in 25m rapid-fire pistol event and securing India’s 17th Olympic Quota in Shooting.
My best wishes to you, may you go from strength to strength and bring glory to the nation. pic.twitter.com/21ireXOXQH
— Anurag Thakur (@ianuragthakur) January 13, 2024
577 गुणांसह, विजयवीर सिद्धूने पात्रता फेरीत चौथे स्थान मिळवले आणि अंतिम फेरीत प्रवेश केला. कझाकची नेमबाज निकिता चिर्युकिन, रिपब्लिक ऑफ कोरियाचा सॉंग जोंग-हो, सुकजिन हाँग आणि जेक्युन ली आणि जपानची दाई योशिओका हे इतर नेमबाज होते ज्यांनी पदक फेरीत प्रवेश केला.
शनिवारी अंतिम फेरीत पोहोचलेल्या सहापैकी चार नेमबाजांना कोटा जागा मिळणे निश्चित होते. चंदीगडच्या विजयवीरने एलिमिनेशन राऊंडमध्ये 28 शाॅटसह लक्ष्य गाठून रौप्य पदक जिंकून अभिमानाने कोटा गाठला. विजयवीर कझाकिस्तानच्या निकिता चिर्युकिनला मागे राहिला ज्याने 32 शॉटसह सुवर्णपदक जिंकले.
जकार्ता येथे भारताने आतापर्यंत चार पॅरिस ऑलिम्पिक कोटा मिळवला आहे. विजयवीर व्यतिरिक्त, ईशा सिंगला महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत पॅरिस कोटा, पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत वरुण तोमर आणि महिलांच्या 25 मीटर पिस्तूल स्पर्धेत रिदम संगवानला पॅरिस कोटा मिळाला.