Asian Championship : भवानीदेवीने रचला इतिहास; ‘अशी’ कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
Updated On:

चीन :- भारताची ऑलिम्पिकपटू स्टार महिला तलवारबाज भवानीदेवीने आपल्या कारकीर्दीतील सर्वोत्तम कामगिरी करताना आशियाई क्रीडा स्पर्धेत इतिहास रचला आहे. तिने उपांत्य फेरीत पराभव पत्करल्यावरही ब्रॉंझपदक निश्चित केले आहे.
अशी कामगिरी करणारी भवानीदेवी भारताची पहिलीच महिला तलवारबाज खेळाडू ठरली आहे. आशियाई तलवारबाजीत आजवर भारताच्या एकाही खेळाडूला पदक मिळवता आलेले नव्हते. ही उणिव भवानीदेवीने भरून काढली.
भवानीदेवीने जपानची माजी जागतिक विजेती खेळाडू मिसाकी इमुराचा उपांत्यपूर्व फेरीत 15-10 असा पराभव केला व उपांत्य फेरी गाठली होती.
मात्र, उपांत्य फेरीत तिला उझबेकिस्तानच्या झायनाब दायिबेकोव्हाकडून 15-14 असा एका गुणाने निसटता पराभव पत्करावा लागल्याने ब्रॉंझपदकावर समाधान मानावे लागले.





