Asian Championships | कुस्तीपटू रवी कुमार दहियाची सुवर्ण हॅट्ट्रिक

मंगोलिया – आशियाई चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताचा आघाडीचा कुस्तीपटू रवी कुमार दहियाने सलग तिसऱ्यांदा सुवर्ण जिंकत ऐतिहासिक हॅट्ट्रिक साधली आहे. 57 किलो गटाच्या अंतिम फेरीत दहियाने कझाकिस्तानच्या रखत कलझानविरुद्ध विजय मिळवित सुवर्ण कामगिरी केली.
दुसरीकडे, बजरंग पुनियाने पुरुषांच्या 65 किलो वजनी गटात इराणच्या रहमान मौसाकडून 1-3 असा पराभव पत्करून रौप्यपदक जिंकले. टोकियो ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या रवीने त्याच्या सर्व लढतींमध्ये सुरुवातीच्या काळात आघाडी स्वीकारली.
विजेतेपदाच्या लढतीत कलझानने टेक-डाउनसह आगेकूच केली आणि बराच वेळ रवीला कोणतीही हालचाल करू दिली नाही. तथापि, रवीने आपल्या शैलीनुसार अतुलनीय चढाईत वर्चस्व गाजवण्यास सुरुवात केली.
त्याने सलग पॉइंटर्स घेत प्रभाव पाडला आणि मध्येच डाव्या पायाच्या हल्ल्यापासून स्वतःला वाचवत भारताला या वर्षीच्या स्पर्धेतील पहिले सुवर्णपदक मिळवून दिले. दरम्यान, भारताने स्पर्धेत आतापर्यत एक सुवर्ण, चर रौप्यपदकांसह एकूण 15 पदकांची कमाई केली आहे.



