अश्विनी महांगडेचे ‘स्टार प्रवाह’वर कमबॅक; नव्या भूमिकेत दिसणार

Ashwini Mahangade | अभिनेत्री अश्विनी महांगडे स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते‘ मालिकेत पाहायला मिळाली. यात तिने अनघाची भूमिका साकारली होती. यानंतर आता ती पुन्हा एकदा स्टार प्रवाहतील एका मालिकेत दिसणार आहे. विशेष म्हणजे यात ती एका वेगळ्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे.
अश्विनीने सोशल मीडियावर नव्या मालिकेतील लूक शेअर करत ही माहिती शेअर केली. अश्विनी आता स्टार प्रवाहवरील ‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेत दिसणार आहे. ती या मालिकेत ‘माया’ ही भूमिका साकारणार आहे. अश्विनीच्या या नव्या मालिकेविषयी चाहत्यांनी देखील आनंद व्यक्त केला आहे. Ashwini Mahangade |
View this post on Instagram
अश्विनी महांगडेच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर, ‘महाराष्ट्र शाहिर’ सिनेमात अश्विनी झळकली होती. या सिनेमात अश्विनीने अंकुश चौधरीसोबत काम केलं. ‘आई कुठे काय करते’ मालिकेमुळे अश्विनी घराघरात पोहोचली. याआधी तिने ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ मालिकेमध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या बहिणीची म्हणजे राणूअक्का यांची भूमिका साकारली होती. तिची ही भूमिका प्रेक्षकांच्या प्रचंड पसंतीस पडली होती. Ashwini Mahangade |
हेही वाचा:
कुमार विश्वास यांच्या पत्नीवर गैरव्यवहाराचे आरोप ; मंजू शर्मांचा RPSC सदस्यत्वाचा राजीनामा





