Paris Olympics 2024 (Badminton) : पोनप्पा-क्रॅस्टो जोडीचा सलग दुसरा पराभव, पुढील वाटचाल झाली खडतर….

Paris Olympics 2024 (Badminton,Womens Doubles Group Stage) : पॅरिस ऑलिम्पिक 2024 मधील बॅडमिंटन महिला दुहेरीत अश्विनी पोनप्पा आणि तनिषा क्रॅस्टो या भारतीय जोडीला ग्रुप स्टेजमध्ये सलग दुसऱ्या सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले आहे. त्यांना जपानच्या नामी मात्सुयामा आणि चिहारा शिदा या चौथ्या मानांकित जोडीने 21-11 आणि 21-12 ने पराभूत केले.
तत्पूर्वी,पहिल्या सामन्यात पोनप्पा-क्रॅस्टो जोडीचा दक्षिण कोरियाच्या इओंग सो किम आणि योंग ही कोंग यांनी 21-18,21-10 असा पराभव केला होता. आता भारतीय जोडीसाठी पुढील वाटचाल खूपच अवघड आहे. स्पर्धेतील आव्हान टिकवण्यासाठी त्यांना पुढील सामना जिंकण्याबरोबरच इतर संघांच्या निकालावरही अवलंबून राहावे लागणार आहे. पोनप्पा-क्रॅस्टो जोडीचा पुढील सामना मंगळवारी (30 जुलै) ‘सेत्याना मापासा आणि अँजेला यू’ या आॅस्ट्रेलियन जोडीशी होणार आहे.
तर दुसरीकडे, बॅडमिंटन पुरुष दुहेरीमध्ये सात्विक साईराज – चिराग शेट्टी यांची जर्मनी विरुद्धची लढत रद्द झाली आहे. ही लढत जर्मनीच्या मार्क लैम्सफस याला दुखापत झाल्याने ही लढत रद्द करण्यात आली आहे. यामुळे पुरुष दुहेरीमध्ये पदक मिळण्याच्या आशा कमी झाल्या आहेत. जर्मन खेळाडू मार्क लैम्सफसच्या घोट्याला दुखापत झाल्याने, त्याने या स्पर्धेतून माघार घेतली.
Paris Olympics 2024 (Badminton) : लक्ष्य सेनचा आणखी एक शानदार विजय….
सात्विक व चिरागने फ्रान्सच्या लुकास कोरवी आमी रोनन लाबार या जोडीला २१-१७, २१-१४ असे पराभूत करताना विजयी सुरुवात केली होती. सात्विक आणि चिराग यांची पुढील लढत इंडोनेशियाच्या फजर अल्फियान आणि मुहम्मद रियान यांच्यासोबत राहणार आहे.





