Paris Olympics 2024 (Badminton) : लक्ष्य सेनचा आणखी एक शानदार विजय….

Paris Olympics 2024 (Badminton, Lakshya Sen vs Julien Carraggi) : पहिला ऑलिम्पिक खेळत असलेला भारताचा युवा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनने पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतील आपला दुसरा व अधिकृतरित्या पहिला सामना जिंकला आहे. त्याने बेल्जियमच्या ज्युलिया कॅरागीचा सरळ गेममध्ये 2-0 ने पराभव केला आहे.
यापूर्वी लक्ष्य सेनचा पहिल्या सामन्यातील विजय रद्द घोषित करण्यात आला होता कारण त्याचा प्रतिस्पर्धी म्हणजेच ग्वाटेमालाचा केविन कॉर्डन याने हाताच्या दुखापतीमुळे पॅरिस ऑलिम्पिक 2024 मधून त्याचे नाव मागे घेतले होते. बॅडमिंटन जागतिक महासंघाच्या (BWF) ग्रुप स्टेजच्या नियमांनुसार, जर एखाद्या खेळाडूने स्पर्धेतून माघार घेतली, तर त्याच्याद्वारे खेळलेल्या सर्व सामन्यांचे निकाल रद्द केले जातात आणि याच नियमाचा लक्ष्य सेनला फटका बसला होता.
🏸 Lakshya Sen defeated Julien Carraggi of Belgium by 21-19, 21-14 in his second group stage game!#Paris2024 #Cheer4Bharat #Olympics #Badminton pic.twitter.com/XuBTmzxD5j
— Doordarshan Sports (@ddsportschannel) July 29, 2024
त्यानंतर सोमवारी पुन्हा झालेल्या बॅडमिंटनच्या एल गटातील एकेरीच्या पहिल्या सामन्यात लक्ष्य सेनने बेल्जियमच्या ज्युलिया कॅरागीचा सरळ गेममध्ये पराभव केला आहे. लक्ष्य सेनने सलग दोन्ही सेट जिंकत पुरूष एकेरी बॅडमिंटन स्पर्धेतील बेल्जियमच्या कॅरागीविरूद्धचा सामना जिंकला.
लक्ष्यने पहिला सेट 21-18 तर दुसरा सेट 21-14 या फरकाने जिंकला. हा सामना 43 मिनिटे चालला. आता, लक्ष्य सेनचा पुढील सामना बुधवारी(31 जुलै) दुपारी 1.40 वाजता इंडोनेशियाचा क्रिस्टी जोनाथन विरूध्द होणार आहे.





