R Ashwin Retirement: रविचंद्रन अश्विनचा मोठा निर्णय, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून घेतली निवृत्ती

R Ashwin announces retirement: भारताचा दिग्गज गोलंदाज रविचंद्रन अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया या संघांमध्ये बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी अंतर्गत 5 कसोटी सामन्यांची मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील ब्रिस्बेन येथे खेळला जाणारा तिसरा कसोटी सामना अनिर्णित राहिला. या सामन्यानंतर अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली.
अश्विन गाबा येथे खेळलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्याचा भाग नव्हता. मात्र, याआधी अॅडिलेट येथे खेळलेल्या डे नाइट कसोटी सामन्यात तो भारतीय संघाचा भाग होता. या सामन्यात त्याने 53 धावा देत 1 विकेट घेतली होती.
𝙏𝙝𝙖𝙣𝙠 𝙔𝙤𝙪 𝘼𝙨𝙝𝙬𝙞𝙣 🫡
A name synonymous with mastery, wizardry, brilliance, and innovation 👏👏
The ace spinner and #TeamIndia‘s invaluable all-rounder announces his retirement from international cricket.
Congratulations on a legendary career, @ashwinravi99 ❤️ pic.twitter.com/swSwcP3QXA
— BCCI (@BCCI) December 18, 2024
अश्विन हा भारताकडून कसोटीमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा दुसरा खेळाडू आहे. त्याने आपल्या 14 वर्षांच्या कारकिर्दीमध्ये 106 कसोटी सामन्यात भारताचे प्रतिनिधीत्व केले. त्याने 106 कसोटी 24 च्या सरासरीने 537 विकेट्स घेतले आहेत. तसेच, त्याने 6 शतके व 14 अर्धशतकांसह कसोटी सामन्यांमध्ये 3503 धावा केल्या आहेत.
त्याला तब्बल 11 स्पर्धांमध्ये मालिकावीरचा पुरस्कारही मिळाला आहे. कसोटीमध्ये एका डावात 5 विकेट्स घेण्याची कामगिरी 37 वेळा केली आहे. तसेच, कसोटीमध्ये 268 डावखुऱ्या फलंदाजांना बाद करण्याचा विक्रम देखील त्याच्या नावावर आहे. तो 116 वनडे आणि 65 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये देखील भारतीय संघाचा भाग होता. या सामन्यांमध्ये त्याने अनुक्रम 156 आणि 72 विकेट्स घेतल्या आहेत.





