Rahuri Bypoll Election : राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवार जाहीर; शिवाजीराव कर्डिलेंच्या निधनानंतर कोणाला मिळाली संधी?
Rahuri Bypoll Election : शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या राहुरी विधानसभेसाठी अनेकजण इच्छुक होते..

Rahuri Bypoll Election : दिवंगत आमदार शिवाजीराव कार्डिले यांच्या निधनानंतर राहुरी विधानसभा पोटनिवडणुक होणार आहे. यासाठी भाजपकडून उमेदवाराचे नाव जाहीर करण्यात आले आहे.
शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर त्यांचा मुलगा अक्षय कार्डिले यांना राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
या पोटनिवडणुकीसाठी सुरूवातीपासूनच अक्षय कर्डिले यांच्या नावाची चर्चा होती. शेवटी भाजपाने अक्षय कर्डिले यांनाच तिकिट दिले. वडिलांच्या जागी आता अक्षय कर्डिले निवडणूक लढवतील.
शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या राहुरी विधानसभेसाठी अनेकजण इच्छुक होते. माजी खासदार सुजय विखे पाटील या निवडणुकीसाठी इच्छुक होते. सुजय विखे पाटील यांनी आपल्याला तिकिट मिळण्याकरिता अनेक प्रयत्न केल्याची चर्चा आहे.
शिवाजीराव कार्डिलेंची राजकीय कारकीर्द Rahuri Bypoll Election
गेल्यावर्षी 17 ऑक्टोबर रोजी शिवाजीराव कार्डिले यांचे निधन झाले. अहिल्यानगर जिल्ह्याच्या राजकारणातील एक दिग्गज व्यक्तिमत्व म्हणून शिवाजीराव कर्डिले यांचे ओळख होती. दूध व्यवसाय हा त्यांचा मूळ व्यवसाय होता. बुऱ्हानगर गावचे सरपंच ते आमदार, माजी मंत्री असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला आहे. Rahuri Bypoll Election
भाजपा केंद्रीय चुनाव समिति ने महाराष्ट्र में होने वाले विधानसभा उप-चुनाव 2026 के लिए श्री अक्षय शिवाजीराव कर्डिले के नाम पर अपनी स्वीकृति प्रदान की है। pic.twitter.com/aZxTe7uQAM
— BJP (@BJP4India) April 1, 2026
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप अशा पक्षातून त्यांनी काम पाहिले. राहुरी विधानसभा मतदारसंघातून त्यांनी सलग अनेक वर्षे आपले वर्चस्व कायम राखले होते. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि विविध शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून त्यांनी ग्रामीण भागातील विकासकामांना गती दिली.
शिवाजी कर्डिले हे 2009 मध्ये अपक्ष म्हणून प्रथम निवडून आले होते. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस कडून लोकसभा निवडणूक लढवली होती, त्यात त्यांचा पराभव झाला होता. 2014 ला पुन्हा आमदारकी लढवत विजय मिळवला, पण 2019 च्या निवडणुकीत त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते.
दरम्यान, अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा मतदारसंघाची व बारामती या दोन्ही ठिकाणी 23 एप्रिल रोजी पोटनिवडणूक होणार आहे. तर 4 मेला मतमोजणी होऊन निकाल लागणार आहे.
हेही वाचा:






