Ashok Kharat Case : अशोक खरात अतिशय घाणेरडा, रुपाली चाकणकर वादावर प्रफुल पटेल यांचं मोठं विधान
Ashok Kharat Case : रुपाली चाकणकर यांच्यासोबतचे खरातचे फोटो आणि व्हिडिओ समोर आल्यानंतर त्यांच्यावर टीका वाढली आहे. त्यांच्या राजीनाम्याची मागणीही जोर धरत आहे. या संदर्भात प्रश्न विचारला असता सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया देण्यास टाळाटाळ केली.

Ashok Kharat Case : नाशिक येथील कथित अत्याचार प्रकरणावरून राज्यातील राजकारण तापले आहे. ज्योतिषी अशोक खरात याला अटक झाल्यानंतर विविध नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर प्रफुल पटेल यांनी कठोर शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. Ashok Kharat
प्रफुल पटेल म्हणाले, “भोंदूबाबांचे प्रकार अत्यंत घाणेरडे आणि चुकीचे आहेत. अशोक खरातवर कडक कारवाई झालीच पाहिजे. तसेच त्याच्याशी संबंधित असणाऱ्या व्यक्तींवरही योग्य ती कारवाई झाली पाहिजे.” काही राजकीय नेत्यांची नावे समोर येत असल्याचे सांगत, राष्ट्रवादी काँग्रेस या प्रकरणात आवश्यक ती भूमिका घेईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, रुपाली चाकणकर यांच्यासोबतचे खरातचे फोटो आणि व्हिडिओ समोर आल्यानंतर त्यांच्यावर टीका वाढली आहे. त्यांच्या राजीनाम्याची मागणीही जोर धरत आहे. या संदर्भात प्रश्न विचारला असता सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया देण्यास टाळाटाळ केली. “योग्य वेळी बोलेन,” असे सांगत त्यांनी नाराजी व्यक्त केली. Ashok Kharat Case

Ashok Khara case
या प्रकरणी सरकारवाडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपानुसार, अशोक खरात याने एका ३५ वर्षीय महिलेला गुंगीचे औषध देऊन अत्याचार केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी बुधवारी पहाटे त्याला ताब्यात घेतले. Ashok Kharat Case
अशोक खरात हा सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथील श्री ईशान्येश्वर मंदिर ट्रस्टचा अध्यक्ष असून मर्चंट नेव्हीमधून निवृत्त अधिकारी आहे. अंकशास्त्रज्ञ आणि ‘कॉस्मॉलॉजी एक्स्पर्ट’ म्हणून त्याने ओळख निर्माण केली होती. अनेक राजकीय नेते, सेलिब्रिटी आणि उद्योजक त्याच्याकडे सल्ल्यासाठी जात असल्याची माहिती आहे. या धक्कादायक प्रकरणामुळे राज्यभरात खळबळ उडाली असून पुढील तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.Ashok Kharat Case





