Resignation of NCP leaders : मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेसच्या तीन नेत्यांचे राजीनामे मंजूर; सुनील तटकरेंविरोधात नाराजी?
Resignation of NCP leaders : अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील विविध सेल प्रमुखांनी राजीनामे दिले असून, तीन नेत्यांचे राजीनामे मंजूर करण्यात आले आहेत. राजीनामा देण्यामागचे कारण पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याविषयी नाराजी असल्याचे सांगितले जात आहे.

Resignation of NCP leaders : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गोटातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पक्षातील तीन नेत्यांनी त्यांच्या पदाचे राजीनामे दिले आहेत. विशेष म्हणजे हे राजनामे मंजूरही करण्यात आल्याची माहिती माध्यमांनी दिली आहे.
त्यामुळे राष्ट्रवादीत मोठी खळबळ उडाली आहे. या नेत्यांनी राजीनामा देण्यामागचे धक्कादायक कारणही समोर आले आहे. अजित पवार हयात असताना तीन नेत्यांचे राजीनामे मंजूर करण्यात आले नव्हते. मात्र, त्यांच्या पाश्वात राजीनामे मंजूर करण्यात आहेत. त्यामुळे या निर्णयावर आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
अजित पवार यांचे २८ जानेवारीला विमान अपघातात निधन झाले. त्यापूर्वी म्हणजेच २६ जानेवारीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अनेक सेल प्रमुखांनी अजित पवार यांची भेट घेतली होती. या भेटीत त्यांनी आपले राजीनामे अजित पवार यांच्याकडे सोपवले होते. पण अजित पवारांनी राजीमाने मंजूर केले नाहीत. राजीनामा देण्यामागे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याविषयी नाराजी असल्याचे सांगितले जात आहे.
अजित पवार यांच्या निधनाला बरोबर एक महिना पूर्ण झाला असून, राजीनामे मंजूर करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे या नेत्यांना कोणतेही कारण न विचारतच त्यांचे राजीनामे मंजूर करण्यात आले आहेत. अजित पवार हयात असताना वेगळी वागणूक मिळत होती, अशी खंत राजीनामा दिलेल्या सेल प्रमुखांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, या घडामोडीमुळे विविध चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे या प्रकरणात पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून काही भूमिका मांडण्यात येणार का, हे पाहणे महत्वाचे असणार आहे.
या नेत्यांचे राजीनामे मंजूर (Resignation of NCP leaders)
मनोज व्यवहारे : असंघटित कामगार विभाग प्रदेशाध्यक्ष,
सुभाष मालपाणी : उद्योग विभाग प्रदेशाध्यक्ष
सचिन जाधव : मोटार मालक वाहतूक संघटना प्रदेशाध्यक्ष
हेही वाचा : Esha Gupta : अभिनेत्री ईशा गुप्ता सुरक्षित भारतात परतली; पोस्टद्वारे शेअर केला अनुभव






