Team India Head Coach : मुख्य प्रशिक्षकपदासाठी ‘या’ दोन दिग्गज क्रिकेटपटूंच्या नावाची चर्चा, पण….

नवी दिल्ली :– भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा कार्यकाळ संपत असून त्यांच्या जागी कोण असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच करार वाढवायचा किंवा नाही याबाबत अद्याप विचार केलेला नाही, असे खुद्द द्रविड यांनीच सांगितले होते. त्यामुळे त्यांच्याशी कारार वाढवला जाणार का असाही प्रश्न आहे.
मात्र, त्यातच भारतीय क्रिकेट वर्तुळात व्हीव्हीएस लक्ष्मण व आशिष नेहरा यांच्या नावाच्या चर्चांनी जोर आहे. मात्र, या दोघांपैकी कोणाशीही संपर्क साधण्यापूर्वी बीसीसीआयचे प्रतिनिधी द्रविडशी चर्चा करणार आहेत. त्यांनी जर करार वाढवण्यास होकार दिला तर तेच या पदावर कायम राहतील, असे संकेतही बीसीसीआयने दिले आहेत.
दरम्यान, भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड हे आपले पद सोडणार असल्याचे वृत्त सातत्याने पसरले जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर द्रविड यांनी अद्याप असा कोणताही विचार नाही असे सांगत या अफवांना पूर्णविराम दिला आहे.
रवी शास्त्री यांच्यानंतर द्रविड यांच्याकडे मुख्य प्रशिक्षकपादी जबाबदारी सोपवण्यात आली होती. तसेच त्यांचा करार रविवारी पार पडलेल्या एकदिवसीय सामन्यांच्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यापर्यंतच होता. त्यानंतर हा करार वाढवण्यास खुद्द द्रविडही तयार नाहीत, असे संकेत मिळत होते. मात्र, त्यावर बीसीसीआय तसेच द्रविड यांच्याकडून कोणताही खुलासा करण्यात आलेला नव्हता. मात्र, रविवारचा सामना संपल्यावर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत द्रविड यांनीच हा खुलासा केला व ही चर्चा थांबवली.






