Ashadhi Wari 2025 : संत तुकोबांची पालखी पुण्यनगरीत दाखल; लाखो वारकऱ्यांची भक्तिमय मांदियाळी

Saint Tukaram Maharaj Palkhi । Pune : राम कृष्ण हरीच्या जयघोषाने पुणे नगरी दुमदुमून गेली आहे. देहूतून संत तुकाराम महाराज पालखी आणि आळंदीतून संत ज्ञानेश्वर महाराज पालखी पुण्यासाठी रवाना झाली आहे. जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा आपला दुसरा मुक्काम आटोपून पुढील मुक्कामासाठी पुण्याकडे मार्गस्थ झाला आहे.
संत तुकाराम महाराजांची पालखी पुण्यात दाखल होताच संभाजी भिडे यांच्याकडून पालखीला वंदन करण्यात आले. दरवर्षी प्रमाणे यंदाही संभाजी भिडे यांच्या कडून तुकाराम महाराज यांच्या पादुकांना वंदन केले.
दापोडी येथे दुपारचा मुक्काम करून सोहळा चार वाजताच्या सुमारास संगमवाडी परिसरातून पुण्यात दाखल झाला आहे. पालखीचा पुण्यातील नानापेठेतील श्री निवडुंगा विठ्ठल मंदिरात या सोहळ्याचा दोन मुक्काम असेल.
संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी फुलेनगर येथे पालखी सोहळा दुपारचा विसावा घेऊन संध्याकाळी 4 च्या सुमारास संगमवाडी परिसरातून पुण्यात दाखल झाली आहे. संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे बुधवारी (ता. १८) देहूतून आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे गुरुवारी (ता. १९) आळंदीतून प्रस्थान झाले.
आज, २० जून २०२५ रोजी ८०० वर्षांची पवित्र परंपरा लाभलेली पंढरपूर वारी सुमारे ३ ते ४ लाख वारकऱ्यांसह पुण्यात दाखल झाली असून, संपूर्ण पुण्यनगरीत भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. पुणे पोलिसांचा देखील शहरात कडक बंदोबस्त असल्याचं दिसून येत आहे





